जळकोट तालुक्यातील मशागतीची कामे पूर्ण
By Admin | Updated: June 16, 2014 01:14 IST2014-06-16T00:32:34+5:302014-06-16T01:14:58+5:30
एम़जी़मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील बळीराजाने आपल्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली असून, तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट तालुक्यातील मशागतीची कामे पूर्ण
एम़जी़मोमीन , जळकोट
जळकोट तालुक्यातील बळीराजाने आपल्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली असून, तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात एकूण शेतीचे क्षेत्रफळ ३४ हजार हेक्टर्स असून, त्यापैकी २५ हजार हेक्टर्स जमीन पेरणीयोग्य आहे. जळकोट तालुका हा खरीपाचा म्हणून ओळखला जातो. या हंगामात सोयाबीन, ज्वारी, मूग, तूर आदी पेरा करण्यात येतो. यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा केला जातो. तालुक्यातील शेती ही सुपिक असल्याने ८० ते ९० टक्के शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बळीराजाला पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
शेतातील सर्व मशागतीची कामे पूर्ण करून आता आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी कृषी दुकानांवर गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. जळकोट तालुक्यातील खताच्या कोट्यामध्ये १०: २६:२६ तीनशे टन, २४:२४:०० - २३८ टन, २०:२०:२० - २९० टन, १८:४६:०० - २९५ टन, १५:१५:१५- ११८ टन, एसएसपी १५७ टन, युरिया ३६५ टन, १२:३२:१६ - ५४ टन, एमओपी- ४० टन असा एकूण १८५७ टन खत शिल्लक असल्याची माहिती तालुका कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

गतवर्षीपेक्षा यावर्षी बी-बियाणे व खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. शेतकरी गारपिटीच्या तडाख्यात अडकला असताना या भाववाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, बी-बियाणांसाठी पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची कसरत होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून प्रत्येक खते व बी-बियाणांची रक्कम जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते दुकानदारांकडून खरेदी करताना पावती घ्यावी व बियाणांच्या पिशवीवरील देयके पाहून रक्कम द्यावी. कुठलाही दुकानदार खते-बियाणासाठी आगाऊ पैशाची मागणी करीत असल्यास कृषी विभाग किंवा कृषी अधिकारी बालाजी किरवले यांच्याशी संपर्क साधावा.
बियाणे व खताची उपलब्धता़़़
खताच्या एका पोत्याची किंमत २८९ रुपये, डीएपी ११८०, ११९० रुपये, २०:२०:० आरसीएफ ८०९ रुपये, २०:२०:१३-८५३, ८८९ रुपये, १०:२६:२६- ११०९, ११०० रुपये, एसएसपी पॉवर ३५० रुपये, दाणेदार ३५९ रुपये, २४:२४:०- ९३९ रुपये, एएमएम ४९०, एमओपी ८४० रुपये, १२:३२:१६-११२७ रुपये या प्रमाणात किंमती असल्याचेही सांगण्यात आले.
महाबीज सोयाबीन २३८५ रुपये, ईगल एक्सलर २३७५ रुपये, ईगल एस ३३५-२७२०, ईगल बेसीफ-२५६५ रुपये, कृषीधन-२५०० रुपये, ओमकार-२५ किलो-२६२५ या दराप्रमाणे बियाणे बाजारात उपलब्ध असल्याची माहिती दिली.