शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा तक्रारींचा पाढा

By admin | Updated: August 18, 2014 00:58 IST

जळगाव सपकाळ : केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी १५ आॅगस्ट रोजी जि.प. सदस्या रूख्मिणीताई सपकाळ

जळगाव सपकाळ : केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी १५ आॅगस्ट रोजी जि.प. सदस्या रूख्मिणीताई सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती दर्शवून. गावातील विविध समस्या ग्रामसभेसमोर मांडल्या.जळगाव सपकाळ ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आयोजित ग्रामसभेला ग्रामसेवक ए.ई गायकवाड यांनी केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागाच्या विकासासाठी खास करून महिलांसाठी शिवणयंत्र, पिठगिरणी, शालेय मुलींसाठी सायकल वाटप, तसेच बचत गटांसाठी विविध व्यवसायासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे असे विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना गायकवाड यांनी दिली. ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नावर महिलांनी गावातील मूलभूत प्रश्नांवर जोरदार चर्चा करून आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभेसमोर मांडले. आरोग्य उपकेंद्राला केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर्स उपलब्ध करून देणे, उपकेंद्राच्या स्वच्छतागृहाची घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने गावात मोठी दुर्गंधी पसरली.त्यामुळे स्वच्छतागृह बंद करण्यात यावे, किंवा त्याची नियमित साफसपाई करण्यात यावी, गावातील झालेली रस्त्यांची दुरवस्था, नाल्याच्या सफाईस, ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे तो कित्येक दिवसांपासून उचल्या न गेल्याने मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले आहे.दलित वस्ती सुधार योजनेची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावी, आणि गावात महिलासाठी स्वच्छतागृह बांधण्यात यावीत, अशा अनेक आपल्या जिव्हळ्याचा प्रश्न संदर्भात गावातील महिलांनी ग्रामसभेत आपल्या तक्रारीचा पाढा वाचला.यावेळी जि.प.सदस्या रूख्मिणी सपकाळ, सरपंच उत्तमराव सोनवेणे, ग्रामसेवक गायकवाड यांनी महिलांचे सर्व म्हणणे ऐकून घेवून त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी निधीचे नियोजन करू, जिल्हा परिषदेकडून काही निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन जि.प.सदस्या सपकाळ यांनी उपस्थित महिलांना दिले.यावेळी तारा सपकाळ शारदा सपकाळ, उषा साडवे, अश्विनी बेलेकर, आरोग्य सेवक एम.के.हिरेकर आदी महिलांची उपस्थिती होती. (वार्ताहर)उपकेंद्राच्या आरोग्य सेविका कामटे यांनी पावसाळ्यातील आजार व स्वच्छता या विषयी उपस्थित महिलांना महिती दिली. आठवड्यातून एक दिवस तरी सर्वांनी कोरडा दिवस म्हणून पाळावा. बारा आठवड्याच्या आत गदोदर माता नोंदणी करावी अशी माहिती दिली. अंगणवाडी सेविका मीना सोनवणे यांनी बालकांना दररोज अंगणवाडीत पाठविण्याचे आवाहन उपस्थित महिलांना केले.