बँकेतून पैसे गायब झाल्याची तक्रार
By Admin | Updated: July 13, 2017 00:20 IST2017-07-13T00:17:29+5:302017-07-13T00:20:40+5:30
औंढा नागनाथ : येथील एसबीआय बँकेतून के.प्रा.शा. पुरजळ येथील शिक्षकांचे ११ हजार रुपये परस्पर गायब झाले आहेत. याबाबत तक्रार देवूनही काहीच कारवाई नाही.

बँकेतून पैसे गायब झाल्याची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील एसबीआय बँकेतून के.प्रा.शा. पुरजळ येथील शिक्षकांचे ११ हजार रुपये परस्पर गायब झाले आहेत. याबाबत तक्रार देवूनही काहीच कारवाई नाही.
प्रा.शा. पुरजळ येथील सहशिक्षक सखाराम धनसिंग राठोड (५५) हे बँकेत पैसे काढण्यास गेले असता ११ हजार रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शाखा व्यवस्थापकाशी चर्चा केली असता हे पैसे औंढा येथील एटीएमवरून काढले गेल्याची माहिती दिली; परंतु सदरील दिवशी एटीएम घरीच होते. यासंदर्भात पोलीस स्टेशन औंढा येथे तक्रार दिली असून तब्बल दोन महिन्यांपासून पोलीस उपनिरीक्षक गिरीधारी कांबळे हे तपास करीत आहेत. परंतु अद्याप तपास लागला नाही. बँकेचे शाखा व्यवस्थापकांशी यासंदर्भात चर्चा केली असता त्यांनी एटीएम सीसीटीव्ही फुटेजसाठी ई-मेल किंवा परंतु अद्याप फुटेज आले नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रमाणेच प्रा.शा. गोळेगाव येथील सहशिक्षिका अर्चना निरगुडे यांचेही १० हजार रुपये एटीएमवरून कपात झाले; परंतु त्यांना मिळाले नसल्याचीही त्यांनी बँकेकडे तक्रार केली आहे. या घटनेत मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे. या संदर्भात पैसे परत मिळण्यासाठी बँकेत खेटे मारत आहेत.