‘त्या’ महिलेबाबत अखेर हरविल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:52+5:302021-02-05T04:08:52+5:30
प्रीती कुंभकर्णे यांचे माहेर वैजापूर असून, २२ जानेवारी रोजी त्या मुलाला सोबत घेऊन वैजापूरला आल्या हाेत्या. धरण परिसरात वाहनातून ...

‘त्या’ महिलेबाबत अखेर हरविल्याची तक्रार
प्रीती कुंभकर्णे यांचे माहेर वैजापूर असून, २२ जानेवारी रोजी त्या मुलाला सोबत घेऊन वैजापूरला आल्या हाेत्या. धरण परिसरात वाहनातून उतरल्यानंतर काही तरी आणण्याच्या बहाण्याने त्या मुलाला तेथेच सोडून निघून गेल्या. काही वेळानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली. मात्र त्या न सापडल्याने त्यांनी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय निर्माण झाला. यानंतर औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. मात्र दोन दिवस अथक प्रयत्न केल्यानंतरही महिलेचा मृतदेह न सापडल्याने मुलगा वेदांत याने आई हरविल्याची तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलीस प्रीती कुंभकर्णे यांचा शोध घेत आहेत.
फोटो कॅप्शन : नारंगी धरणात महिलेचा शोध घेताना अग्निशमन दलाचे जवान व पोलीस.