मद्यधुंद सहा वाहन चालकांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:48+5:302015-12-14T23:53:04+5:30
लातूर : शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मद्यधुंद वाहनचालकांनी रविवारी रात्री मद्यप्राशन करुन वाहन चालविल्याचे, पोलिसांच्या विशेष तपासणी मोहिमेत आढळून आले.

मद्यधुंद सहा वाहन चालकांवर गुन्हा दाखल
लातूर : शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मद्यधुंद वाहनचालकांनी रविवारी रात्री मद्यप्राशन करुन वाहन चालविल्याचे, पोलिसांच्या विशेष तपासणी मोहिमेत आढळून आले. याप्रकरणी या सहा जणांविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदेड नाका रोड परिसरातील गरुड चौक, विवेकानंद चौक, बाभळगाव नाका, गुळ मार्केट आणि बसवेश्वर चौक आदी ठिकाणी पोलिसांनी रविवारी रात्री विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान मनोज ज्ञानोबा रेड्डी (४०) रा. नाथ नगर लातूर, दत्तात्रय बलभीमराव कदम (३३) रा. हडको कॉलनी, लातूर, रोहन अजित गायकवाड (४२४) रा. मळवटीरोड लातूर, नंदकुमार भीमराव राठोड (३१) रा. महाराणा प्रतापनगर कोळपातांडा ता. लातूर, संजय विठ्ठल बकूनार (३२) रा. हिमायतनगर लातूर आणि बाळासाहेब रामचंद्र माने (३२) रा. इकबाल चौक, लातूर हे मद्यप्राशन करुन वाहन चालविताना पोलिस तपासणीत आढळून आले.
शहरात वाहन तपासणी...
वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी आणि लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणीत हे वाहनचालक आढळून आले.