विविध समस्यांविषयी नगरसेवकांचीच तक्रार

By Admin | Updated: May 16, 2014 00:19 IST2014-05-15T23:54:51+5:302014-05-16T00:19:31+5:30

परभणी: रस्ते, नाल्या यासह स्वच्छतेच्या प्रश्न प्रभागात वाढले आहेत.

Complaint of corporators about various problems | विविध समस्यांविषयी नगरसेवकांचीच तक्रार

विविध समस्यांविषयी नगरसेवकांचीच तक्रार

परभणी: रस्ते, नाल्या यासह स्वच्छतेच्या प्रश्न प्रभागात वाढले आहेत. या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रभाग २० मधील नगरसेवक मोहम्मद हसीबूर रहेमान आणि खान मुन्सीफ नय्यर यांनी आयुक्तांकडे केली आहे. या दोन्ही नगरसेवकांनी आयुक्तांना एक पत्र दिले असून, त्यात प्रभागात असलेल्या विविध समस्यांचा उहापोह केला आहे. या प्रभागात नाल्या काढणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे नाल्यांची सफाई वेळच्या वेळी होत नाही. प्रभागातील नाल्या तुडंूब भरलेल्या आहेत. नळांना पाणी सुटल्यानंतर नालीतील घाण पाणी रस्त्यावर येते व लोकांना या रस्त्यावरुन येणे- जाणे करताना त्रास होत आहे. गडी मोहल्ल्याच्या वरच्या भागात २० वर्षांपासून नळाचे पाणी येत नाही. हा भाग उंचावर असल्याने या ठिकाणी पाणी पोहोचत नाही. खंडोबा बाजार येथील पाण्याची टाकी ते गडीच्या वरच्या भागापर्यंत नवीन पाईप लाईन टाकणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भोई गल्ली भागात जलवाहिनी सडलेली आहे. त्यामुळे लोकांना दूषित पाणी नळाद्वारे येत आहे. परिणामी आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभाग २० हा पूर्णत: गावठाण भाग आहे. या भागातील पथदिवे बंद आहेत. खांबावर चढून लाईट फिटींग करणारा माणूस येथे नाही. या सर्व समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी या नगरसेवकांची आहे.

Web Title: Complaint of corporators about various problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.