महापौर, आयुक्त, उपायुक्तांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:18 IST2017-08-06T00:18:50+5:302017-08-06T00:18:50+5:30

गोदावरी नदी प्रदूषणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापौर शैलजा स्वामी, आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरूद्ध पर्यावरण कायद्यांतर्गत नांदेड मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी दिली

Complaint against Mayor, Commissioner, Deputy Commissioner | महापौर, आयुक्त, उपायुक्तांवर गुन्हा दाखल

महापौर, आयुक्त, उपायुक्तांवर गुन्हा दाखल

नांदेड : गोदावरी नदी प्रदूषणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापौर शैलजा स्वामी, आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरूद्ध पर्यावरण कायद्यांतर्गत नांदेड मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी दिली.
पर्यावरणमंत्री कदम यांनी जून महिन्यात नांदेड दौºयावर असताना गोदावरी नदीची पाहणी केली होती़ नांदेड शहरातील १९ नाले थेट गोदावरी नदीत सोडण्यात आल्याचे चित्र या पाहणीत पुढे आले़ याप्रकरणी कारवाईचे आदेश पर्यावरणमंत्र्यांनी दिले होते़ या आदेशानंतर औरंगाबादच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी गोदावरी नदीतील पाण्याचे नमुने घेतले होते़ हे पाणी नमुने दुषित असल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर प्रादेशिक अधिकारी जितेंद्र संगेवार यांच्या तक्रारीवरून महापौरांसह आयुक्त आणि एका उपायुक्तांवरही प्रदूषण कायद्यान्वये जिल्हा न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे़
दरम्यान, या प्रकरणात महापौर, आयुक्त आणि उपायुक्तांनी तीन महिन्यांत गोदावरी शुद्धीकरणाचे काम पूर्ण होईल, असे शपथपत्र न्यायालयात दाखल केले आहे़ त्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात आली असल्याचे पर्यावरणमंत्री कदम म्हणाले़
लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या गोदावरी नदीच्या शुद्धीकरणाबाबत शिवसेना गंभीर असून या प्रकरणात जबाबदार असलेल्यांविरूद्ध कारवाई होईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले़

Web Title: Complaint against Mayor, Commissioner, Deputy Commissioner