सखी मंच सदस्यांसाठी स्पर्धा
By Admin | Updated: June 29, 2014 00:43 IST2014-06-29T00:36:51+5:302014-06-29T00:43:47+5:30
जालना : लोकमत सखी मंच आणि जया कॉस्मेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यांसाठी ३० जून रोजी रांगोळी, नववधू मेकअप, मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सखी मंच सदस्यांसाठी स्पर्धा
जालना : लोकमत सखी मंच आणि जया कॉस्मेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यांसाठी ३० जून रोजी रांगोळी, नववधू मेकअप, मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
जुना जालना भागातील खेरूडकर मंगल कार्यालयात सायंकाळी ४ वाजेपासून स्पर्धांना सुरूवात करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसांबरोबरच सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. जया कॉस्मेटिक्सच्या वतीने विजेत्या र्स्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
या तिन्ही स्पर्धांसाठी लागणारे आवश्यक साहित्य सदस्यांनी स्वत: आणणे बंधनकारक आहे. रांगोळी स्पर्धेसाठी ४ बाय ४ चौरसफुट जागेमध्ये रांगोळी काढण्यात येईल. यासाठी एक तासांचा अवधि असणार आहे. मात्र, चाळणी, गाळणीचा वापर करता येणार नाही. नववधू मेकअपसाठी सदस्यांनी मॉडेल सोबत आणावे. नोंदणीसाठी जास्तीत जास्त सखी मंच सदस्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. नाव नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी ९६६५१०११३४ या क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो. (प्रतिनिधी)
ज्या सखी मंच सदस्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही, त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी एक तासपूर्वी नोंदणी करता येणार आहे.