स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन आज सिडको नाट्यगृहात
By Admin | Updated: August 23, 2014 00:50 IST2014-08-23T00:28:45+5:302014-08-23T00:50:04+5:30
औरंगाबाद : लोकमत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन शनिवारी संत तुकाराम नाट्यगृहात होत आहे़

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन आज सिडको नाट्यगृहात
औरंगाबाद : लोकमत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन शनिवारी दुपारी ३़३० ते सायंकाळी ६़३० या वेळेत सिडको एन-५ मधील जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात होत आहे़ हे संमेलन तीन सत्रांमध्ये होईल़
लोकमतने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षाविषयक मालिकेचा एक भाग म्हणून हे संमेलन आयोजिण्यात आले आहे़ त्यात पहिल्या सत्रामध्ये स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे प्रख्यात लेखक तथा मार्गदर्शक प्रा़तुकाराम जाधव यांचे 'एमपीएससी अभ्यास व काळजी' या विषयावर मार्गदर्शन होणार असून या सत्राची सुरुवात दुपारी ३़३० वाजता होईल़ त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकरराव कोकाटे हे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांच्या निवड प्रक्रियेवर मांडणी करतील़
तिसऱ्या सत्रात आयपीएस अप्पर पोलिस अधीक्षक डॉ़बसवराज तेली हे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा अॅटिट्यूड व अॅप्टिट्यूड तसेच मुलाखत तंत्रावर मार्गदर्शन करतील़ दरम्यान, या संमेलनासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे़
शेवटी विद्यार्थ्यांच्या निवडक लिखित प्रश्नांना प्रमुख वक्ते उत्तरे देतील़ हे संपूर्ण संमेलन सलगपणे सुरू राहणार असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रथम येणाऱ्यास प्रथम आसन राहील़ त्यामुळे प्रशासन सेवेत भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे़ (लोकमत ब्युरो)