शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात कायमस्वरूपी अपंग झालेल्या महिलेस ६२ लाख रुपये ६ टक्के व्याजासह नुकसानभरपाई 

By प्रभुदास पाटोळे | Updated: December 19, 2023 15:58 IST

अपघातातील गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा दावा मंजूर

छत्रपती संभाजीनगर : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंग झालेल्या ज्योती गणेश घोडके (२३, रा. तळेगाव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ट्रकचालक, मालक आणि विमा कंपनी यांनी दावा दाखल केल्याच्या तारखेपासून सयुक्तरीत्या ६२ लाख २९ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या सदस्या रिचा डी. खेडेकर यांनी नुकताच दिला. या रकमेवर ६ टक्के दराने व्याज द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.

तळेगाव येथील गणेश काशीनाथ घोडके त्यांची पत्नी ज्योती यांच्यासह दुचाकीने ३० जानेवारी २०२० रोजी जळगाव- छत्रपती संभाजीनगर रस्त्याने सिल्लोडकडे जात होते. ते भवन गावाजवळ आले असता सिल्लोडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात गणेश किरकोळ, तर ज्योती गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या दोन्ही पायांवरून ट्रक गेल्यामुळे त्या कायमस्वरूपी अपंग झाल्या होत्या. नुकसानभरपाई मिळावी यासाठी ज्योती यांनी ॲड. सुनील एस. थिटे आणि ॲड. सुरेश फुके यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायाधिकरणाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्वसुनावणीदरम्यान वकिलांनी न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले की, अपघात झाला तेव्हा जखमी महिला २३ वर्षांची होती. ती सुदृढ होती व शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. कुटुंबात तीच कमावती होती. अपघातातील गंभीर दुखापतीमुळे तिला कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. तिची कामाची क्षमताच गेली आहे. तिला तिचे वैयक्तिक कामसुद्धा करता येत नाही. त्यासाठी तिला दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. अपघातानंतर तिच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च, शारीरिक व मानसिक त्रास, वाहतुकीचा खर्च, गंभीर दुखापतीमुळे भविष्यातही तिला वैद्यकीय उपचाराची गरज लागणार आहे. दैनंदिन कामासाठी मदतनीस म्हणून एका व्यक्तीची गरज लागणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यू