शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

ट्रकचालकाने पळविला मद्य निर्मिती कंपनीचा ३२ लाखाचा दारूसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 20:14 IST

चिकलठाणा एमआयडीसीतील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीने कोल्हापुरला नेण्यासाठी ३२ लाख १६ हजार ३५७ रुपयांचा दारूसाठा ट्रान्सपोर्ट कंपनीकडे दिला होता.

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीने कोल्हापुरला नेण्यासाठी ताब्यात दिलेला तब्बल ३२ लाख १६ हजार ३५७ रुपयांचा दारूसाठा दोन ट्रकचालक आणि ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकांनी पळविल्याचे समोर आले. हा प्रकार १८ ते १९ जानेवारी दरम्यान घडला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

ट्रकचालक बाळकृष्ण शंकर इंगळे, प्रमोद यादव चोरमारे आणि बजाजनगर येथील शिवनेरी ट्रान्सपोर्टचे मालक जगन्नाथ पाटील अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, चिकलठाणा एमआयडीसीतील युनायटेड स्प्रीट लिमिटेड या कंपनीकडे कोल्हापुर येथील रॉयल ट्रेडर्स या शासकीय परवानाधारक दारू विक्रेत्याने दारूची मागणी नोंदविली होती. मागणीनुसार कंपनीने बजाजनगर येथील शिवनेरी ट्रान्सपोर्टचे मालक जगन्नाथ पाटील यांना दारू वाहतुक करण्याचे काम सोपविले. 

पाटील यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीने बाळकृष्ण इंगळे आणि प्रमोद चोरमारे या चालकांना (ट्रक क्रमांक एमएच-१९ झेड २५५६ ) कंपनीत पाठविले. १८ जानेवारोजी त्यांनी ट्रकमध्ये ३२ लाख १६ हजार ३५७ रुपये किंमतीची दारू विश्वासाने दिली. हा दारूसाठा कोल्हापुरला १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पोहचविण्याचे सांगण्यात आले होते. मात्र आरोपींनी संगनमत करून हा दारूसाठा कोल्हापुरमधील रॉयल ट्रेडर्सला न पोहचविता त्यांनी परस्पर दुसऱ्याच ठिकाणी नेऊन गायब केल्याचे समोर आले. वेळेत दारूसाठा प्राप्त न झाल्याचे रॉयल ट्रेडर्सकडून कळताच कंपनीचे अधिकारी नंदकिशोर कैलास सिन्हा यांनी याविषयी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांचे मोबाईल बंद असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी लगेच या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविली.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी