कंपनीत चोरी करणारा कामगार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:41 IST2019-03-04T22:41:09+5:302019-03-04T22:41:20+5:30
वाळूज एमआयडीसीतील इंडुरन्स कंपनीत चोरी करणाऱ्या कंपनीतील कामगाराला सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.

कंपनीत चोरी करणारा कामगार पकडला
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील इंडुरन्स कंपनीत चोरी करणाऱ्या कंपनीतील कामगाराला सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. हिमांशुसिंग ठाकुर (२९), असे कामगाराचे नाव असून, त्याला रांजणगाव येथील राहत्या घरातून ताब्यात घेऊन चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वाळूज एमआयडीसीतील इंडुरन्स कंपनीत चार दिवसांपूर्वी मेटल स्टिलचे जवळपास १७ हजार रुपयाचे ब्रेकपॅडचे साहित्य चोरीला गेले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर कंपनीचे संदीप जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, कामगाराने चोरीचे साहित्य राहत्या घरी ठेवल्याची माहिती सोमवारी पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने हिमांशुसिंग ठाकुर याला रांजणगाव येथून ताब्यात घेतले. तसेच चोरी झालेले साहित्यही हस्तगत केले.