पीकविमा मंजुरीसाठी कंपन्यांचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:06 IST2021-04-09T04:06:16+5:302021-04-09T04:06:16+5:30
पीकविम्यासाठी कंपन्यांनी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर देण्याच्या जाचक अटीमध्ये सोयगावचा शेतकरी अडकला ...

पीकविमा मंजुरीसाठी कंपन्यांचा हिरवा कंदील
पीकविम्यासाठी कंपन्यांनी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर देण्याच्या जाचक अटीमध्ये सोयगावचा शेतकरी अडकला होता. निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा संबंधित टोल फ्री क्रमांकावर बोलणे झाले नव्हते. त्यामुळे पीकविम्याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली. परंतु उंबरठा कमी आल्याच्या माहितीवरून सोयगावला पीकविमा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मका, सोयाबीन या पिकांची अतिवृष्टीत माती झालेली आहे. परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीतून सोयगाव तालुक्याला वगळले गेले. आता या पिकांना पीकविमा मिळण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.
आणेवारी महत्त्वाची ठरली
सोयगाव तालुक्याची अंतिम आणेवारी ४७ टक्के इतकी जाहीर करण्यात आली. पीकविम्यासाठी आणेवारी महत्त्वाची ठरली आहे. तहसीलदार प्रवीण पांडे यांनी आणेवारीबाबतचे वारंवार स्मरणपत्रही दिल्याने संबंधित कंपन्या आता विमा देण्यासाठी तयार झाल्याची माहिती हाती आली आहे.