घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर

By Admin | Updated: July 21, 2014 00:20 IST2014-07-20T23:53:36+5:302014-07-21T00:20:50+5:30

बीड : शहरातील हॉटेल, वडापावसह इतर गाडे, स्विट होम आदी ठिकाणी सर्रास घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरले जात आहे.

Commercial use of domestic gas cylinders | घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर

घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर

बीड : शहरातील हॉटेल, वडापावसह इतर गाडे, स्विट होम आदी ठिकाणी सर्रास घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरले जात आहे. गंभीर बाब म्हणजे रहदारीची ठिकाणी उघड्यावर असे सिलिंडर वापरले जात असल्याने अनुचित घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते. असे असले तरी अशा लोकांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावले जात आहे.
घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर शासनाच्या वतीने सवलतीच्या किंमतीमध्ये देण्यात येतात. मात्र, अनेक व्यावसायिक अशा सिलिंडरचा सर्रास वापर करतात. शहरातील सुभाष रोड, स्टेडियम परिसर, बशीरगंज, राजुरी वेस परिसर, बसस्थानकासमोरचा परिसर अशा अनेक ठिकाणी काही छोटे व मोठे व्यावसीयाक गॅस सिलिंडरचा वापर करतात. गॅस वापरताना त्यांच्याकडून कोणतीही सुरक्षितता बाळगली जात नसल्याने धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा सिलिंडर वापरावर कारवाईची मागणी होत आहे. अशा वापरासह काही वाहनांमध्येही अनधिकृतपणे सिलिंडर वापरले जाते. अशांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संतापही व्यक्त होत आहे. गंभीर बाब म्हणजे काहींकडून असे अनधिकृत सिलिंडर विक्रीही केले जात आहे. अशा वेळी चढ्या दराने सिलिंडर विक्री करून काळाबाजार होत आहे़ त्यामुळे असे प्रकार थांबविण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
यात्रेतील दुकानात झाला होता स्फोट
माजलगाव तालुक्यातील बाराभाई तांडा येथे यात्रा होती़ एका तंबूत छोटेखानी हॉटेल होते़ या ठिकाणी अनधिकृत गॅस सिलिंडर वापरण्यात येत होते़ यावेळी गॅस व्यवस्थित न हाताळल्याने स्फोट झाला होता़ यामध्ये काही भाविक जखमी झाले होते़ असे प्रकार होऊ नयेत म्हणून अनधिकृत गॅस सिलिंडर वापराला बंदी घालण्याची मागणी आहे़
बीडच्या गाड्यांची बाहेर जिल्ह्यात पासिंग
बीड जिल्ह्यात चार चाकी वाहनांमध्ये अधिकृत गॅस भरण्याची सुविधा नसल्याने येथे गॅसवरील गाड्यांची आरटीओ कार्यालयात पासिंगही होऊ शकत नाही़ त्यामुळे बीडमधील काही लोकांनी बाहेर जिल्ह्यात आपल्या गाड्यांची पासिंग केलेली आहे़ अशा गाड्या आता बीडमध्ये सर्रास दिसून येत आहेत़ या गाड्यांमध्ये अनधिकृतपणे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर वापरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे़ अनेकदा रस्त्यावरच वाहनचालक घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस वाहनाच्या टाकीत भरतात़ यामध्येही जीवितास प्रचंड धोका असला तरी काही पैशांची बचत होत असल्याने वाहनचालक हा धोका पत्कारत असल्याचे सर्रास दिसून येत आहे़

Web Title: Commercial use of domestic gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.