शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प; दौलताबाद-वेरूळ महामार्गावरील हॉटेल चालकांनी मांडली चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:40 IST

व्यावसायिक सिलिंडर बंद झाल्याने ढाबा चालकांसमोर चुलीचा पर्याय

खुलताबाद: व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने दौलताबाद, खुलताबाद आणि वेरूळ परिसरातील हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी अनेक हॉटेल आणि ढाबा चालकांनी पुन्हा पारंपरिक चुलींचा आधार घेतला आहे. यामुळे या भागात येणाऱ्या पर्यटकांना आता चक्क चुलीवर बनवलेल्या जेवणाचा अस्सल ग्रामीण स्वाद चाखायला मिळत आहे.

पर्यटकांची चुलीवरील जेवणाला पसंतीदौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदिर आणि भद्रा मारुती येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. गॅसअभावी काही हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर असताना, अनेक चालकांनी लाकूड आणि सरपणावर स्वयंपाक सुरू केला आहे. चुलीवर बनवलेली भाजी-भाकरी आणि वरण-भात पर्यटकांना अधिक चविष्ट वाटत असल्याने, या हॉटेल्समध्ये गर्दी वाढू लागली आहे.

चालकांची हतबलता आणि संधी"व्यावसायिक सिलिंडर बाजारात मिळतच नसल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. नाईलाजास्तव आम्ही जुन्या पद्धतीने चुली मांडल्या आहेत. मात्र, यामुळे पर्यटक आकर्षित होत असल्याचे समाधान आहे," असे एका ढाब्याचे संचालक संदीप शेळके यांनी सांगितले. एकूणच, गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असला तरी, 'चुलीवरील जेवण' ही या भागातील पर्यटनाची नवी ओळक बनू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas shortage forces hotel owners to use traditional stoves.

Web Summary : Commercial gas supply disruptions in Daulatabad, Khultabad, and Verul force hotels to use traditional stoves. Tourists now enjoy authentic rural cuisine, boosting business for some.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर