वाणिज्य वार्ता :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:02 IST2021-01-21T04:02:56+5:302021-01-21T04:02:56+5:30

फुलंब्री : तालुक्यातील निधोना येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनेलला बहुमत मिळाले आहे. त्यांचे ९ पैकी ६ जागांवर उमेदवार ...

Commerce talks: | वाणिज्य वार्ता :

वाणिज्य वार्ता :

फुलंब्री : तालुक्यातील निधोना येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनेलला बहुमत मिळाले आहे. त्यांचे ९ पैकी ६ जागांवर उमेदवार निवडून आले आहेत.

निधोना ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे समर्थक पॅनेलने ९ पैकी ६ जागा जिंकल्या व बहुमत मिळविले. या पॅनेलचे नेतृत्व देविदास गाडेकर, कडूबा राऊतराय, कारभारी गाडेकर यांनी केले. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सुभाष बबन राऊतराय, बिजुबाई दादाराव राऊतराय, संतोष दादाराव निधोनकर, शेख मोईन शेख शफीक, गीता शिवसिंग गुसिंगे, मनीषा भावसिंग राजपूत यांचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांचे गावकऱ्यांनी स्वागत केले.

फोटो कॅप्शन : निधोना ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी ग्रामविकास पॅनेलला बहुमत मिळाले आहे. विजयी जल्लोष करताना देविदास गाडेकर, शेख मोईन व इतर उमेदवार.

Web Title: Commerce talks: