वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:22+5:302021-01-13T04:10:22+5:30
हतनूर : हतनूर ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची ग्रामपंचायत मानली जाते. प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. गावातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच ...

वाणिज्य वार्ता
हतनूर : हतनूर ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची ग्रामपंचायत मानली जाते. प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. गावातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दोन अधिकृत पॅनल, तर १३ जण अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावीत आहेत. यावर्षी आदर्श ग्रामविकास पॅनलने विविध विकासकामांचे मुद्दे घेऊन मैदानात उडी घेतलेली आहे.
टाकी बचाव पॅनलच्या अडचणीत यंदा आदर्श ग्रामविकास पॅनलने उडी घेऊन आणखी वाढ केली आहे. पंचायत समितीची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे उमेदवार कैलास अकोलकर, पंचायत समिती सदस्य किशोर पवार यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले. केवळ विकासाचे मुद्दे घेऊनच ते गावात प्रचारात उतरले आहेत. गावकऱ्यांनी संधी दिली, तर गावाचा विकास करू, असे आश्वासन उमेदवार पुष्पा किशोर पवार यांनी दिले आहे. गावात अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आदर्श ग्रामविकास पॅनलला सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.