वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:30+5:302021-01-08T04:09:30+5:30
सिल्लोड : येथील सुमन हॉस्पिटलमध्ये मोफत बीपी, शुगर, थायरॉइड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री ...

वाणिज्य वार्ता
सिल्लोड : येथील सुमन हॉस्पिटलमध्ये मोफत बीपी, शुगर, थायरॉइड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या शिबिरात ९७० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
धन्वंतरी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शिबिरात मधुमेह चिकित्सक डॉ. ज्ञानेश्वर गजभारे, डॉ. नीलेश मिरकर यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. यावेळी डॉ. मच्छिंद्र पाखरे, डॉ. सुषमा मिरकर, डॉ. शेखर दौड, डॉ. संतोष शिंदे, डॉ. अभिलाष गोलेचा, डॉ. अमर राजपूत, डॉ. प्रवीण परदेशी, डॉ. बाबासाहेब जाधव, डॉ. सुहास जगताप, डॉ. विकास गोठवाल, डॉ. चेतन झंवर, डॉ. फिरोज पठाण, डॉ. शकील खान, डॉ. वसीम देशमुख, डॉ. विशाल अकाते, डॉ. सुहास वडगावकर, डॉ. राजेंद्र पडोळ, डॉ. भाऊसाहेब तायडे, डॉ. सी.पी. जैन, डॉ. पांडुरंग चौधरी, डॉ. उमेश विसपुते, डॉ. किशोर ढोरमारे, डॉ. नाना भवर, डॉ. मोहसीन खान, सर्फराज खान व डॉ आशिष पाटील यांची उपस्थिती होती. उल्लेखनीय कामगिरीचे ना अब्दुल सत्तार यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलेश मिरकर यांनी केले. डॉ. शेखर दौड यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन : सिल्लोड येथील सुमन हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मधुमेहचिकित्सक डॉ. ज्ञानेश्वर गजभारे, डॉ. नीलेश मिरकर, डॉ. मच्छिंद्र पाखरे, डॉ. शेखर दौड आदी मान्यवर.