वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:24+5:302021-01-08T04:09:24+5:30
सोयगाव : गरजूंना मदत करण्यात जे समाधान मिळते, ते समाधान कशातच मिळत नाही. कोरोनाच्या संकटात शिवसैनिकांनी जीव धोक्यात घालून ...

वाणिज्य वार्ता
सोयगाव : गरजूंना मदत करण्यात जे समाधान मिळते, ते समाधान कशातच मिळत नाही. कोरोनाच्या संकटात शिवसैनिकांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. वाढदिवस हे एक निमित्त आहे. यातून सर्व सामान्यांना मदत करण्याचा आमचा प्रमुख उद्देश असतो. सर्वसामान्यांचा आशीर्वाद हाच खरा अमूल्य ठेवा आहे, यातून जगण्याची ऊर्मी मिळते, असे भावोद्गार महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सोयगाव येथील दत्त मंदिराच्या आवारात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले. त्यानंतर गरजूंना धान्य व ब्लँकेट वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुका प्रमुख प्रभाकर (आबा) काळे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, दिलीप मचे, उस्मानखाँ पठाण, संतोष बोडखे, मंगलाबाई राऊत, रमेश गव्हांडे, गजानन चौधरी, अक्षय काळे, दिनेश हजारी, बाबू चव्हाण, दारासिंग चव्हाण, शिवाप्पा चोपडे, राजमल पवार, सलीम पठाण, शमा तडवी, डॉ. जहांगीर देशमुख, महेश चौधरी, अमोल मापारी, समाधान काळे, प्रकाश बोर्डे, नंदू हजारी, मुकुंद तळले, राधेश्याम जाधव, योगेश नागपुरे, शेख रऊफ, वसंत राठोड, प्रताप राठोड, श्रावण जाधव, शरीफ शहा, राजू तिडके, जावेद पिंजारी, भगवान वारंगणे, आत्माराम गोतमारे, जितेंद्र चौधरी, संध्याताई मापारी, दीपक बागूल आदींची उपस्थिती होती.
-----------
सोयगाव : गरजूंना धान्य, ब्लँकेटचे वाटप करताना सोयगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी.