वाणिज्य वार्ता : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अंतिम हप्त्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:03+5:302021-02-05T04:10:03+5:30

प्रास्ताविकात गटनेते संतोष कोल्हे म्हणाले की, मोहीम राबवत बँकेच्या माध्यमातून २ हजार २७ अर्ज जमा करत त्यापैकी ९५९ लाभार्थ्यांकडे ...

Commerce News: Distribution of final installment to the beneficiaries under Pradhan Mantri Awas Yojana | वाणिज्य वार्ता : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अंतिम हप्त्याचे वाटप

वाणिज्य वार्ता : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अंतिम हप्त्याचे वाटप

प्रास्ताविकात गटनेते संतोष कोल्हे म्हणाले की, मोहीम राबवत बँकेच्या माध्यमातून २ हजार २७ अर्ज जमा करत त्यापैकी ९५९ लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा असल्याने न.प.ने त्यांचा वेगळा प्रस्ताव बनवला आहे. पहिल्या टप्प्यातील ४६६ लाभार्थ्यांची कामे अंतिम टप्प्यात असून, १११ जणांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. १ हजार ५९ लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन आणि घर नाही, अशांसाठी न.प.ने जमीन घेतली असून, लाभार्थ्यांना ६ महिन्यांत सदनिका देणार असल्याचे कोल्हे म्हणाले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा छाया जंगले, युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, तालुकाध्यक्ष बबनराव बनसोड, शहराध्यक्ष अहेमद अली, युवक तालुकाध्यक्ष कल्याण पवार, जिल्हा सरचिटणीस केशव राठोड, रवी महोरकर, महिला अध्यक्ष सविता मातेरे, मुख्याधिकारी हारुण शेख व नगरसेवक उपस्थित होते.

- कन्नड : लाभार्थ्यांना धनादेश देताना कैलास पाटील, भाऊसाहेब पा. तरमळे, बबनराव बनसोड, संतोष कोल्हे, छाया जंगले, स्वाती कोल्हे आदी.

Web Title: Commerce News: Distribution of final installment to the beneficiaries under Pradhan Mantri Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.