येणारा काळ हा केवळ ‘इंटरनेट आॅफ थिंग’चा

By Admin | Updated: October 16, 2016 01:14 IST2016-10-16T00:48:19+5:302016-10-16T01:14:46+5:30

औरंगाबाद : संशोधन म्हणजे नावीन्यपूर्ण गोष्टीचा शोध होय. त्यामुळे संशोधन करताना सध्या काय स्थिती आहे आणि त्यामध्ये काय सुधारणा करणे आवश्यक आहे,

The coming time is just 'Internet of Things' | येणारा काळ हा केवळ ‘इंटरनेट आॅफ थिंग’चा

येणारा काळ हा केवळ ‘इंटरनेट आॅफ थिंग’चा


औरंगाबाद : संशोधन म्हणजे नावीन्यपूर्ण गोष्टीचा शोध होय. त्यामुळे संशोधन करताना सध्या काय स्थिती आहे आणि त्यामध्ये काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याचा विचार केला पाहिजे. इंटरनेटमुळे जीवनमान मोठ्या प्रमाणात बदलले आहे. त्यामुळे येणारा काळ हा केवळ ‘इंटरनेट आॅफ थिंग’चा असून आतापासून विविध संस्थांनी त्यात पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे, असे प्रतिपादन ग्लोबस एटस् (गुरगाव) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक सिन्हा यांनी केले.
एमजीएम संस्थेच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘हेल्थ के अर टेक्नॉलॉजी सेंटर आॅफ एक्सलन्स’चे गुरुवारी उद््घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘एमजीएम’चे सचिव अंकुशराव कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, विश्वस्त प्रा. प्रताप बोराडे, अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, स्मार्टीफाय हेल्थ प्रा. लि. चे संस्थापक तुषार रतांघरया, राजश्री राजाध्यक्ष, सिरे लॅबचे संस्थापक देवेश राजाध्यक्ष, जेएनईसी महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
अलोक सिन्हा म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जर आपल्या गरजा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सांगितल्या तर त्यावर नक्कीच उपाय शोधतील. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सिरे लॅब व जेएनईसी महाविद्यालयाच्या ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ या प्रयोगशाळेचे उद््घाटन झाले.

Web Title: The coming time is just 'Internet of Things'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.