शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

चला, आपले तीन तास सामाजिक बांधिलकीसाठी...

By admin | Updated: September 4, 2015 00:31 IST

लातूर : दुष्काळ दौऱ्यावर आलेले सत्ताधारी व विरोधी बाकावरील नेते एकमेकांवर टीका करून ‘पर्यटन दौरा’ करून गेले. शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही.

लातूर : दुष्काळ दौऱ्यावर आलेले सत्ताधारी व विरोधी बाकावरील नेते एकमेकांवर टीका करून ‘पर्यटन दौरा’ करून गेले. शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. सिनेअभिनेत्यांनी मात्र सामाजिक बांधिलकीतून मदतीचा उपक्रम हाती घेतला आहे. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देऊन जगण्याचा विश्वास आणि निर्धार ते देत आहेत. सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मराठवाड्याचे सुपुत्र मकरंद अनासपुरे व त्यांच्या सहकारी कलावंतांनी बीडमध्ये आत्महत्या केलेल्या ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजारांची मदत नुकतीच दिली आहे. आता या अभिनेत्यांनी लातूर, नांदेड आणि औरंगाबादचा दौरा हाती घेतला आहे. ५ सप्टेंबर रोजी दगडोजीराव देशमुख सभागृहात हे दोघे आणि त्यांचे सहकारी कलावंत लातुरात येत आहेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ते धीर देणार आहेत. लातूर जिल्ह्यातील ८७ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून गळफास आवळला. त्यांच्या कुटुंबाला हे दोघे आता भेट देणार आहेत. नुसती भेटच नाही, तर त्यांना जगण्याचे बळही देणार आहेत. त्याबरोबर प्रत्येकी १५ हजारांची मदतही देण्याचे नियोजन आहे. मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात दुपारी २ ते ५ या तीन तासांच्या कालावधीत या कुटुंबांशी ते स्नेहबंध जोडणार आहेत. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या कुटुंबांना थेट आणि रोख मदत आम्ही करणार आहोत. आम्ही येतोय, तुम्ही पण या. शेतकऱ्यांना बळ देऊया, असे अपील नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी जनतेलाही केले आहे.लातूर येथे ५ सप्टेंबर रोजी ते शेतकऱ्यांशी हितगुज केल्यानंतर नांदेडला ६ आॅगस्ट रोजी जाणार आहेत. नांदेड येथील कुसुम सभागृहात आणि औरंगाबादेत सिडको नाट्यगृह येथे शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. लातूरसह या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ते मदत करणार आहेत.