शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
4
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
5
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
6
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
7
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
8
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
9
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
10
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
11
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
12
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
13
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
14
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
15
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
16
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
17
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
18
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
19
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
20
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!

'मला घ्यायला या', शेवटच्या कॉलनंतर तरुण बेपत्ता; ३ दिवसांनी आढळला मृतदेह

By सुमित डोळे | Updated: April 16, 2024 13:24 IST

तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह डोंगराच्या पायथ्याखाली आढळला

छत्रपती संभाजीनगर : शनिवारी दुपारी घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुनील गौतम जाधव (२४, रा. राहुलनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या अंगावर गंभीर जखमा असल्याने हा खूनच असल्याच्या निष्कर्षानंतर छावणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील कांचनवाडी येथील कंपनीमार्फत हाऊसकीपिंगचे काम करत होते. १३ एप्रिल रोजी ते कुटुंबाला मित्रांसोबत बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ते कुटुंबाच्या मोबाईलद्वारे संपर्कात होते. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. घाबरलेल्या कुटुंबाने त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र सोमवारी दुपारपर्यंत ते मिळून आले नाही. दुसरीकडे पडेगावच्या पेठेनगरमध्ये वनविभागाच्या डोंगराच्या पायथ्याशी बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणांना दुर्गंधी जाणवली. त्यांनी परिसरात पाहणी केली असता एका आटलेल्या ओढ्यात त्यांना तरुणाचा फुगलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती कळताच छावणीचे निरीक्षक राजेंद्र होळकर, उपनिरीक्षक सोपान नराळे यांनी धाव घेतली. त्यानंतर सुनील यांचा मृतदेह घाटीच्या शवविच्छेदन विभागाकडे रवाना करण्यात आला.

मला भावसिंगपुऱ्यात घ्यायला या, शेवटचा कॉलसुनील यांनी ४ वाजता कुटुंबाला ते भावसिंगपुऱ्यात असल्याचे कळवले होते. त्याच्या काही मिनिटांमध्येच त्यांनी दोन नातेवाईकांना कॉल करून भावसिंगपुऱ्यात घ्यायला येण्यासाठी संपर्क साधला. मात्र, दाेघेही खरेदीमध्ये व्यस्त असल्याने ते तत्काळ जाऊ शकले नाही. काही वेळातच सुनील यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तोपर्यंत मोबाईल बंद झाला होता. त्याच दरम्यान त्यांना पडेगाव परिसरात नेऊन हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत तांत्रिक तपासासह सुनील यांच्या मित्रांची कसून चौकशी सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद