विविध स्पर्धांनी रंगला वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:05 IST2020-12-29T04:05:16+5:302020-12-29T04:05:16+5:30
गीता भवन येथे दि. २२ ते २५ डिसेंबर या काळात या चार दिवसीय सोहळ्याचे आयोजन केले होते. माजी नगरसेवक ...

विविध स्पर्धांनी रंगला वर्धापन दिन
गीता भवन येथे दि. २२ ते २५ डिसेंबर या काळात या चार दिवसीय सोहळ्याचे आयोजन केले होते. माजी नगरसेवक शिवाजी दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोषाध्यक्ष प्रेमचंद तुल्ले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर अध्यक्ष शिवकुमार पाडळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. श्रीराम जोशी यांनी सर्व स्पर्धांचे नियोजन सांभाळले. दि. २४ रोजी बक्षीस वितरण सोहळा, गट प्रमुखांचा सत्कार, विविध समित्यांच्या सदस्यांचा सत्कार असे कार्यक्रम पार पडले.
दि. २५ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भगवद्गीता पठनाचा सामूहिक कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी झालेल्या विशेष साेहळ्याला फेडरेशन ऑफ सिनियर सिटीझन्स ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्रचे विद्यमान अध्यक्ष अरुण रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मीरा पत्की यांनी त्यांचा परिचय करून दिला.
चं. भि. रुणवाल, प्र. शं. पांडे, पी. डी. कुलकर्णी, श्रीराम जोशी, आर. पी. दुसे, प्रा. रमेश कुलकर्णी या माजी अध्यक्षांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला. यानंतर रोडे यांच्या हस्ते ‘स्नेहबंधन’ या संस्थेच्या वार्षिक अंकाचे विमोचन झाले. अंकाच्या संपादिका स्मिता कुलकर्णी, श्रीराम जोशी, माया महाजन, पांडुरंग जोशी यांची यावेळी उपस्थिती होती. प्रा. रमेश व स्मिता कुलकर्णी या दाम्पत्यासह सुलभा कुलकर्णी यांना संस्थाभूषण पुरस्कार देण्यात आला.
सचिव भरत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री पांडे, प्रफुल्ल पांडे, सूर्यकांत कुलकर्णी, विश्वास काळे, श्रीकांत पत्की, विभा श्रीवास्तव, देवेंद्र श्रीवास्तव, डी. बी. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ :
प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या कार्यक्रमात संवाद साधताना अरुण रोडे.