शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीला सर्वत्र थंड प्रतिसाद

By admin | Updated: July 28, 2014 01:05 IST

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने रविवारी जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी मोहीम राबविली.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने रविवारी जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी मोहीम राबविली. मात्र, पुरेशा प्रसिद्धीअभावी शहरात या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळाला. नोंदणी मोहिमेची माहितीच नसल्यामुळे अनेक केंद्रांवर दिवसभर शुकशुकाट होता.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे राज्यात मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जून महिन्यात काही रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यात यादीत नाव नसलेल्या हजारो मतदारांनी नोंदणी अर्ज भरून दिले. परंतु अजूनही १८ वर्षांवरील असंख्य नागरिक यादीत नावनोंदणी करायचे राहिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज पुन्हा हीच मोहीम राबविली. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दिवसभर हजर राहून नोंदणी अर्ज भरून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने या मोहिमेची पुरेशी प्रसिद्धी केली नव्हती. त्यामुळे शहरात थंड प्रतिसाद मिळाला. तुरळक केंद्रांवरच नागरिकांनी येऊन अर्ज भरून दिले. जिल्हा परिषद, देवगिरी हायस्कूल, कडा कार्यालय, खडकेश्वर आदी ठिकाणच्या केंद्रांवर दुपारपर्यंत एखाद-दुसरा अर्ज आला. केवळ ८८८ अर्जशहरातील ८५० मतदान केंद्रांवर दिवसभरात केवळ ८८८ जणांनी नवीन नोंदणीचे अर्ज भरून दिले. मध्य विधानसभा मतदारसंघात २११ जणांचे अर्ज आले. पश्चिम मतदारसंघात २३४ आणि पूर्व मतदारसंघात २११ जणांनी अर्ज भरून दिले. ग्रामीण भागात २५० जणांची नाव नोंदणीशहरापेक्षाही ग्रामीण भागात या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एकूण १,१५८ जणांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. या १,१५८ पैकी ८८८ अर्ज शहरातील आहेत. राहिलेले जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान, ३ आॅगस्ट रोजीही मतदान केंद्रांवर अशीच नोंदणी मोहीम राबविली जाणार असल्याचे शशिकांत हदगल यांनी सांगितले. नोंदणी अधिकारी गैरहजर शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत हजर राहण्याच्या सूचना निवडणूक शाखेने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तरीही काही केंद्रांवर बीएलओ गेलेच नाहीत.तहसील कार्यालयाने काही केंद्रांची पाहणी केली. त्यानुसार भावसिंगपुरा भागातील दोन मतदान केंद्रांवर बीएलओ गैरहजर असल्याचे आढळून आल्याची माहिती तहसीलदार विजय राऊत यांनी दिली.