आचारसंहिता संपताच बदली प्रक्रिया
By Admin | Updated: May 10, 2014 23:50 IST2014-05-10T23:37:36+5:302014-05-10T23:50:30+5:30
बीड : मे महिन्यास सुरुवात होताच जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे वाहू लागले आहे़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच १७ मेपासून बदल्यांच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे़

आचारसंहिता संपताच बदली प्रक्रिया
बीड : मे महिन्यास सुरुवात होताच जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे वाहू लागले आहे़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच १७ मेपासून बदल्यांच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे़ दरम्यान, गतवर्षी जिल्हा परिषदेत बदली घोटाळा गाजला होता़ यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ न देण्याचे आव्हान कायम आहे़ जिल्हा परिषदेतील बदल्या व पदोन्नत्यांचा घोटाळा गतवर्षी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता़ त्यानंतर आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेऊन दोन स्वतंत्र समित्यांमार्फत चौकशी केली होती़ बदल्यांच्या प्रक्रियेत अनियमितता केल्याचा ठपका ठेवून चार कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाईही झाली होती़ बदल्यांतील अनियमिततेचे प्रकरण वर्षभर सतत चर्चेत राहिले़ अशातच आता मे महिना उजाडताच पुन्हा एकदा कर्मचार्यांना बदल्यांची चाहूल लागली आहे़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे़ १० टक्के प्रशासकीय तर १० टक्के विनंती बदल्या होणार आहेत़ त्यासाठी विभागप्रमुखांकडून माहितीही मागविली आहे़ त्यानुसार विभागप्रमुख सध्या याद्या बनविण्याच्या तयारीत व्यस्त आहेत़ माहिती तातडीने सामान्य प्रशासन विभागाकडे पोहंचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. महिला व अपंग कर्मचार्यांना प्राधान्य बदल्यांच्या संचिका रितसर सामान्य प्रशासन विभागातून पुढे जातील़ कुठल्याही उणिवा राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल़ महिला व अपंग कर्मचार्यांना प्राधान्य देण्यात यईल़ कोणावरही अन्याय होणार नाही यादृष्टीने प्रयत्न असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आऱ आऱ भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पारदर्शकता ठेवू मागच्यावेळी काही प्रमाणात चुका झाल्या मात्र, यावेळी असे होणार नाही़ आॅनलाईन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येईल़ प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यावर भर दिला जाणार आहे़ बदल्यांमध्ये अनियमितता करणार्या कर्मचार्यांची गय केली जाणार नाही़ आर्थिक व्यवहार करु नयेत़ तसे काही आढळले तर तडकाफडकी निलंबन करण्यात येईल, असा इशारा सीईओ राजीव जवळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़