सहकार विभागाचे पथक करणार शेतकऱ्यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:23 IST2018-07-14T00:22:48+5:302018-07-14T00:23:04+5:30
पीक कर्ज : फुलंब्री तालुक्याला ९१ कोटींचे उद्दीष्ट

सहकार विभागाचे पथक करणार शेतकऱ्यांना मदत
फुलंब्री : तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीला सहकार विभाग धावला असून येणारे आठ दिवस अधिकारी, गटसचिव बँका व शेतकºयात समन्वय घडवून आणण्याचे काम करणार असून त्यांना पीक कर्ज वाटप करणार आहेत.
फुलंब्री तालुक्यातील बँकांना यंदा ९१ कोटी ७७ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे कर्ज १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान शेतकºयांना वाटप करणे आवशयक आहे. पण कर्जमाफी करण्यात घोळ झाल्याने बँकांनी यंदाच्या पीक कर्ज वाटप प्रकरणे उशिराने हाताळणे सुरु केले. परिणामी पाऊस पडताच शेतकरी बँकांच्या दारात पीक कर्ज घेण्यासाठी चकरा मारू लागले. ज्या शेतकºयांची कर्जमाफी झालेली आहे, त्यांनाच नवीन कर्ज देण्याचे धोरण असल्याने तालुक्यात आतापर्यंत कर्जमाफी केवळ पन्नास टक्केच शेतकºयांना मिळाली. त्यामुळे पीक कर्जही ५० टक्केच शेतकºयांना मिळेल.
पीक उगविले तरी कर्ज मिळेना
आजपर्यंत केवळ ३० टक्केच शेतकºयांना खरीपासाठी पीक कर्ज मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. परिणामी शेतकºयांनी दुकानदारांकडून उधारीवर बियाणे, खते आणली. पिके उगून आली तरी कर्ज मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुक्यात पीक कर्ज मिळालेल्या शेतकºयांची संख्या केवळ ३० टक्केच असून याविषयी शेतकºयांत नाराजी पसरलेली असताना सरकारला उशिराने जाग आली. त्यांनी संबंधित विभागाला आदेश दिल्याने आता शेतकºयांना कर्ज मिळण्यासाठी येणाºया अडचणी सोडविण्याची कामे सुरु झाली आहेत. फुलंब्री तालुक्यात ४ राष्ट्रीयीकृत, ३ ग्रामीण तर १३ शाखा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत.
पथक स्थापन
यासाठी नेमलेल्या पथकात सहायक सहकार निबंधक परमेश्वर वरखडे हे पथकप्रमुख असून सहकार अधिकारी आर.आर. दंडगव्हाळ, लेखापरिक्षक एस. आर. जाधव, कर्ज अधिकारी एस.एन. कोलते, सहकार अधिकारी एन. एफ. जाधव हे पथकात सदस्य आहेत. हे पथक तहसीलदार संगीता चव्हाण यांनी स्थापन केले आहे.
२७ गटसचिव लागले कामाला
तालुक्यात २७ गटसचिव असून ते सर्व जण ११ ते १७ जुलैपासून नेमलेल्या गावात जाऊन शेतकºयांच्या भेटी घेत आहेत. जे शेतकरी कर्जमाफीत बसलेले असताना त्यांना नवीन कर्ज भेटलेले नाही, अशा शेतकºयांचे सर्वेक्षण करून आपल्या अधिकाºयांना अहवाल सादर करणार आहेत. हा सर्व अहवाल १७ जुलै रोजी तहसीलदारांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर तालुक्यातील कर्जवाटपाचे चित्र समोर येईल.