सीएनएक्स एलएमएस

By | Updated: December 4, 2020 04:13 IST2020-12-04T04:13:16+5:302020-12-04T04:13:16+5:30

औरंगाबाद : एमएचटी सीईटीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये शैलेश चव्हाण सरांच्या E4E क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी झेप घेतली आहे. ...

CNX LMS | सीएनएक्स एलएमएस

सीएनएक्स एलएमएस

औरंगाबाद : एमएचटी सीईटीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये शैलेश चव्हाण सरांच्या E4E क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी झेप घेतली आहे. शैलेश सरांचे मार्गदर्शन, हसतखेळत गणित शिकविण्याची पद्धत आणि पेपर सोडविण्यासाठी असलेले शॉर्टकट्स हे सगळे यश मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले असून मॅथ्सच्या तयारीसाठी E4E क्लासेस इज दी बेस्ट ऑप्शन, असा नाराच जणू यशस्वी विद्यार्थ्यांनी दिला आहे.

एक शिक्षक म्हणून नव्हे तर मार्गदर्शक किंवा मित्रत्वाच्या नात्यानेच शैलेश सर नेहमी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे गणित सोडविताना येणारी लहानशी अडचणही विद्यार्थी अगदीच मोकळेपणाने सरांना विचारू शकतात. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम तत्पर असणारे सर आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारे विद्यार्थी या दोघांच्या मेळामुळे क्लासेसने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

चौकट :

मित्रांनो, नाराज होऊ नका

परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रत्येकानेच खूप मेहनत केली आहे; परंतु ज्या विद्यार्थी मित्रांना अपेक्षित स्कोअर आलेला नाही, त्यांनी अजिबात नाराज होऊ नये. अवघ्या चार महिन्यांत तुम्हाला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, नव्या जाेमाने अभ्यास करा आणि तुम्हाला पाहिजे असणारे यश मिळवा. E4E क्लासेसची रिपिटर्स बॅच लवकरच सुरू होत आहे.

-शैलेश चव्हाण

१. E4E इज दी बेस्ट

मला सीईटीच्या मॅथ्सच्या तयारीसाठी क्लास लावायचा होता. त्यावेळी कुठे क्लास लावायचा, हे मी अनेकांना विचारले. तेव्हा प्रत्येेकाकडून E4E हेच एकमेव उत्तर आले. सगळ्यांचे ऐकून मी क्लास लावला; पण आज माझ्या अनुभवावरून निश्चितच सांगू शकते की, E4E इज दी बेस्ट ऑप्शन फॉर मॅथ्स. लॉकडाऊन असल्याने आमचे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने व्हायचे. सरांची शिकविण्याची पद्धत तर अफलातून होतीच; पण त्यासोबतच शिकविणे पूर्ण झाल्यावर कोणता अभ्यास कधी करायचा, कसा करायचा, याचे सरांनी सांगितलेले नियोजन तंतोतंत पाळले आणि सीईटी परीक्षेत यश मिळाले.

- श्वेता पवार

२. वेळोवेळी मिळाले प्रोत्साहन

जेईई किंवा अन्य परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, तर थोडे खचल्यासारखे व्हायचे; पण अशा वेळी शैलेश सर पुन्हा जोमाने अभ्यास करण्यासाठी खूप प्रोत्साहित करायचे. बऱ्याचदा आपल्या पालकांनाही अशा वेळी आपल्याला काय बोलावे किंवा कसे समजावे, हे लक्षात येत नाही. अशा वेळी शैलेश सरांचे मार्गदर्शन खूप मोलाचे वाटायचे. गणिताच्या कन्सेप्ट तर सर शिकवितातच; पण त्यासोबतच ते ज्या शॉर्टकट पद्धती किंवा टेक्निक शिकवितात, त्या कमी वेळेत पेपर सोडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. मला सीईटीमध्ये जे यश मिळाले आहे, त्यात सरांच्या शिकविण्याचा वाटा खूप मोठा आहे.

- चित्रा सांगळे

३. स्मार्ट वर्क करण्यावर भर

सीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही कमी वेळात किती प्रश्न अचूकतेने सोडवू शकतात, हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्क करण्यावर सरांचा भर असायचा आणि तेच आम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरले. शैलेश सरांनी आम्हाला कायम एक मेंटॉर म्हणूनच शिकविले. क्लासमधील वातावरणही खूप छान होते. अभ्यासाचा तणाव तर क्लासमध्ये कधीच यायचा नाही. मॅथ्सव्यतिरिक्त इतर विषयांतही काही अडचणी आल्या तरी सर आम्हाला त्यासाठीही मदत करायला कायम तयार असायचे. सरांचे शिकविणे आणि त्यांनी दिलेले अभ्यासाचे नियोजन अप्रतिम आहे.

- श्रेयश देशमुख

४. हसत- खेळत गणित

E4E क्लासेस म्हणजे केवळ गणिताचा वर्ग असे कधीच नव्हते. गणितासारखा अवघड विषयही सोपा करून कसा शिकवायचा, याची उत्तम हातोटी सरांकडे आहे. गंभीर वातावरणात आम्ही कधीच गणित शिकलो नाही. अत्यंत हसत- खेळत खेळीमेळीच्या वातावरणात आमचा क्लास चालायचा. त्यामुळे विषयाचे दडपण कधीच यायचे नाही आणि दडपण यायचे नाही म्हणूनच आम्हाला अवघड कन्सेप्टही चटकन कळायच्या. अभ्यास करून खूप कंटाळा आला की, सर आमच्यासाठी एखादे रिफ्रेशिंग सेशन घ्यायचे. यात व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन आम्हाला कायमच लक्षात राहील.

- खालीद काद्री

५. वैयक्तिक लक्ष

इतर क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एवढी जास्त असते की, कोणत्या विद्यार्थ्याला काय समजले आणि काय नाही, हे शिक्षकांना कळतच नाही. त्यामुळेच मला E4E क्लासेस इतर क्लासेसपेक्षा वेगळा वाटतो. या क्लासमध्ये शैलेश सरांचे प्रत्येक विद्यार्थ्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष असते. वैयक्तिक लक्ष असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला अमूक एक कन्सेप्ट समजून घेणे, अवघड जाते आहे, हे सर लगेच ओळखू शकतात. विद्यार्थी आणि शिक्षक नाते जरी असले तरी ते आमचे मेंटॉर असल्याने आम्ही नेहमीच मनात कुठलीही भीती न ठेवता आमच्या समस्या त्यांना सांगू शकतो आणि ते त्या समस्या नक्कीच सोडवितात.

- अदिती कामठे

६. शॉर्टकट्स ठरले उपयुक्त

गणित हा विषय अत्यंत उलगडून, सोपा करून आणि हसत- खेळत शिकविण्याच्या सरांच्या पद्धतीला तोड नाही. गणित विषय मला अवघड वाटायचा. त्यामुळे माझा गणितातला स्कोअर नेहमीच जेमतेम याचचा; पण सीईटी परीक्षेत मला गणितात ९९ गुण मिळाले आहेत. हे केवळ E4E क्लासेसमुळेच होऊ शकले. अवघड वाटणारे गणितातील काही धडे मला या क्लासमध्ये अगदी सहजतेने समजले. याचे सगळे श्रेय शैलेश सरांच्या शिकविण्याला जाते. गणित सोडविण्यासाठी सर ज्या शॉर्टकट्स सांगतात, त्यामुळे कमी वेळात अधिकाधिक प्रश्न अचूकतेने सोडविता येतात. त्याचाच आम्हाला फायदा झाला.

- शिवानी भोंबे

Web Title: CNX LMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.