शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

औरंगाबाद-जळगाव मार्गाचे काम बंद, चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी नसल्यामुळे अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 7:05 AM

जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम सध्या बंद पडल्यासारखेच आहे. औरंगाबाद ते अजिंठ्यापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यांत ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम सध्या बंद पडल्यासारखेच आहे. औरंगाबाद ते अजिंठ्यापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यांत ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने ते काम बंद ठेवले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागाच्या देखरेखीखाली या रस्त्याचे काम सुरू असून, विभागातील अभियंतेदेखील त्या कामाच्या गतीबाबत नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याचा मूळ प्रस्ताव द्विपदरीच होता. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’च्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने भूमिपूजनाच्या दिवशी त्या रस्त्याच्या कामाला चौपदरीकरणाची तत्त्वत: मंजुरी दिली. मात्र अंतिम मंजुरी अजून दिलेली नाही. एनएचएआय आणि एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडीची नॅशनल हायवेची यंत्रणा द्विपदरी रस्ता करण्यासाठी तयार होती; परंतु जनरेट्यामुळे त्या रस्त्याचे काम चौपदरीकरणातून करण्याचे ठरले. मात्र, वाढीव निधीसाठी तातडीने मंजुरी मिळाली, तरच ते काम पुढे सरकेल, असे सूत्रांनी सांगितले.तीन टप्प्यांत मिळाली मंजुरीपहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी, तर तिसºया टप्प्यात ३१६ कोटी, अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली. ही तरतदू द्विपदरीकरणासाठी करण्यात आलेली आहे. चौपदरीकरणासाठी सध्या तरी तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. १ हजार कोटींची वाढीव तरतूद नव्याने होण्याची शक्यता आहे. त्या तरतुदीला अंतिम मंजुरी नसल्यामुळे कंत्राटदाराने काम ठप्प ठेवून हात आखडता घेतला आहे.आठ ते दहा दिवसांत मंजुरीराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एल.एस. जोशी यांनी दावा केला की, आठ ते दहा दिवसांत चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. मंजुरीसाठी लागणारा पूर्ण प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच काम गतीने पुढे सरकेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद