येणेगूर टोलनाका बंद
By Admin | Updated: January 15, 2015 00:09 IST2015-01-14T23:49:27+5:302015-01-15T00:09:07+5:30
येणेगूर : तब्बल १२ वर्षाच्या वसुलीनंतर येथील टोलनाका मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बंद करण्यात आला. हा टोलनाका २००२ पासून सुरु झाला होता.

येणेगूर टोलनाका बंद
येणेगूर : तब्बल १२ वर्षाच्या वसुलीनंतर येथील टोलनाका मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बंद करण्यात आला.
हा टोलनाका २००२ पासून सुरु झाला होता. महामार्गाचे रुंदिकरणाचे काम बीओटीनुसार केंद्र शासनाने एका कंपनीस ७२९ कोटीला दिले होते. या कंपनीने महामार्ग रुंदीकरणाचे स्वत: काम न करता ते अन्य दोन कंपन्यांना दिले. आता त्या दोन्ही कंपन्यांनी रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली. रुंदीकरण कामासाठी हा महामार्ग त्या कंपन्यांनी ताब्यात घेतला. त्यामुळे परिसरातील टोलनाका १४ जानेवारीपासून बंद केला. याबाबत भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधीकरणच्या सोलापूर कार्यालयाने दिल्ली येथील मुख्य कार्यालयास शिफारस केली होती. त्यानुसार राज्यमार्ग प्राधीकरण मुंबई यांच्या १३ जानेवारी २०१५ च्या आदेशानुसार सोलापूर सा. बां. खात्याकडून बुधवारी सायंकाळी ६ वाजता येथील टोलनाका बंद करण्यात आला. टोल वसुली बंद झाल्याने वाहनचालक व मालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (वार्ताहर)