शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

ठाणेदारांच्या खांदेपालटाचा मार्ग मोकळा; निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांची यादी जाहीर

By राम शिनगारे | Updated: December 9, 2022 20:18 IST

शहरात दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या अधिकाऱ्यांची खांदेपालट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद :पोलिस आयुक्तालयातील ठाणेदारांच्या रखडलेल्या अंतर्गत बदल्यांना लवकरच मुहूर्त लागणार आहे. राज्याच्या गृह विभागाने पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शहरात दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या अधिकाऱ्यांची खांदेपालट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या बदल्यांची प्राथमिक यादीही तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातून तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या, चारजण इतर ठिकाणांहून शहरात दाखल होणार आहेत.

राज्याच्या गृह विभागाने काढलेल्या बदल्यांच्या आदेशात छावणीचे निरीक्षक शरद इंगळे यांची जळगाव येथे, वेदांतनगरचे सचिन सानप यांची मुंबई शहर आणि शहर वाहतूक शाखेचे मनोज बहुरे यांची अकोला येथे बदली केली आहे. जळगाव येथून पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे, जालना प्रशिक्षण केंद्रातून परवीन यादव, गणेश ताठे आणि औरंगाबाद बीडीडीएस येथून सुशीलकुमार जुमडे यांची आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली. पोलिस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी, सपोनि वामन बेले यांची नांदेड परिक्षेत्र येथे, तर औरंगाबाद ग्रामीणमधील दिनेश जाधव यांची मुंबई शहरात बदली झाली. त्याचवेळी मुंबई येथून सहायक निरीक्षक कल्पेश देशमुख, औरंगाबाद ग्रामीणमधून राजेंद्र बनसोडे आणि परभणी येथून राजकुमार पुजारी यांची आयुक्तालयात बदली केली. शहरातील पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, राजेंद्र बांगर यांची औरंगाबाद परिक्षेत्र, संदीप शिंदे सीआयडी आणि बाळासाहेब आहेर यांची नाशिक परिक्षेत्रात बदली केली आहे.

औरंगाबाद परिक्षेत्रात यांची नियुक्तीऔरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या परिक्षेत्रासाठी गडचिरोली येथील सहायक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब, नागपूर शहरातून साजीद अहमद अब्दुल रशीद, राजेंद्र घुगे, मुंबई शहरातून हनुमंत कांबळे, प्रवीण जाधव, सतीश कोटकर, भाऊसाहेब वाघमोडे, समाधान पवार यांची बदली औरंगाबाद परिक्षेत्रात झाली आहे. त्याचवेळी नांदेड येथून उपनिरीक्षक संतोष गीते, सीआयडीतून कांचन कानडे, औरंगबाद शहरातून गजानन साेनटक्के, राजेंद्र बांगर यांची नियुक्तीही परिक्षेत्रात झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस