शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता विशेषांक धूळ खात; सर्व शिक्षा अभियानात नियोजनाचाच ‘कचरा’

By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST

बीड : दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्वच्छतेचा डंका पिटत असताना येथील सर्व शिक्षा अभियानातील अधिकाऱ्यांना मात्र त्याचे काही देणे-घेणे राहीले नाही की काय?

बीड : दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्वच्छतेचा डंका पिटत असताना येथील सर्व शिक्षा अभियानातील अधिकाऱ्यांना मात्र त्याचे काही देणे-घेणे राहीले नाही की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण डिसेंबर २०१४ मध्ये शाळांसाठी स्वच्छता विशेषांक आले होते, ते फेब्रु्रवारी उजाडला तरी जिल्हा कार्यालयातच धूळ खात पडून आहेत. सफाई तर दूरच; पण विशेषांकालाच अडगळीत टाकून अधिकाऱ्यांनी नियोजनाचा ‘कचरा’ केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पुढे आला.पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ‘जीवन शिक्षण’ हे मासिक प्रकाशित केले जाते. तब्बल ५९ वर्षांची परंपरा असलेले हे मासिक राज्यातील बहुतांश जि.प. शाळांमध्ये जाते. शिक्षण क्षेत्राशी निगडीत मजकूर या विशेषांकातून दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वच्छता मोहीम गतिमान केली. २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर २०१४ या दरम्यान ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ ही विशेष मोहीम घेण्यात आली होती. त्यानुषंगाने डिसेंबर महिन्यात जीवन शिक्षणने स्वच्छता विशेषांक काढला होता. शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांच्यासह इतर वरिष्ठ व तज्ज्ञांचे त्यात लेख व समर्पक छायाचित्रे आहेत. २ हजार ४४७ शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत व ३ हजार २७८ शाळांमधील स्वच्छतागृहे वापरात नाहीत. स्वच्छतागृहांची उपयोगिता व महत्त्व वाढावे, असा उद्देश या मासिकाचा उद्देश होता. शिवाय विद्यार्थ्यांत स्वच्छतेचे महत्त्व वाढावे हा देखील हेतू होता.मासिकांच्या दोन हजारांवर प्रती बीडच्या सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयात डिसेंबर महिन्यात दाखल झाल्या. त्यापैकी निम्म्याच प्रती शाळांमध्ये पोहोचल्या. उर्वरित विशेषांक कार्यालयातच अडगळीला पडलेले आहेत. त्यावर धूळ साचली असून किती पोहोच झाले? किती राहिले? याचा हिशेबही कार्यालयात नाही. विशेषांकावरच धूळ साचल्याने स्वच्छतेची किती ‘काळजी’ आहे? हे देखील यानिमित्ताने समोर आले आहे. (प्रतिनिधी)सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, स्वच्छता विशेषांक शाळांपर्यंत पोहोचवले आहेत. काही राहिले असतील तर ते का वाटप झाले नाही? याची चौकशी करावी लागेल.