सामजिक विचार मंचतर्फे स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:17 IST2019-04-01T23:17:09+5:302019-04-01T23:17:29+5:30

बजाजनगरात सोमवारी सामाजिक विचार मंचतर्फे स्वच्छता अभियान मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

 Cleanliness campaign by Social Idea Forum | सामजिक विचार मंचतर्फे स्वच्छता अभियान

सामजिक विचार मंचतर्फे स्वच्छता अभियान

वाळूज महानगर : बजाजनगरात सोमवारी सामाजिक विचार मंचतर्फे स्वच्छता अभियान मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर परिसरात वृक्षारोपण करुन झाडे जगविण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी केला.


येथील चिंचबन कॉलनी परिसरात सोमवारी सकाळी सामाजिक विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबविली. तसेच कचºयाची विल्हेवाट लावुन नागरिकात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. बजाजनगर परिसरात मंचच्यावतीने लवकरच कचºयाचे वर्गीकरण करुन कंपोस्ट खत निर्मिती करण्याचा निर्णयही पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

या मोहिमेत जि.प.सदस्या रेखा नांदुरकर, कविता देशमुख, प्रणाली प्रधान, कृष्णकांत कोरडे, आज.जी.जाधव, हरिहर बडवे, राम काळदाते, गजानन नांदुरकर, विकास पाटील, केशव ढोले, प्रदिम पाळे, शालिनी ढोले, आशा दबडे, संगिता पाटील, वैशाली आवघडे, रजनी ठाकरे, आरुषी भोळे, जयश्री कराळे, समिक्षा कडु, मिनाक्षी मालोदे, उर्मिला काळदाते, वनिता मोरे, लता माळी, वैशाली खडसे, अश्विनी मोरे, दिलीप दबडे, चंद्रकांत देशमुख, सावता अवघडे आदींनी सहभाग नोंदविला.

Web Title:  Cleanliness campaign by Social Idea Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज