खुलताबादेत दररोज दोन टन कचऱ्याचे वर्गीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:05 IST2020-12-29T04:05:46+5:302020-12-29T04:05:46+5:30
सुनील घोडके खुलताबाद : शहरात दररोज दोन टन कचरा निघतो. नगर परिषद घनकचरा प्रकल्पात यापासून खत निर्मिती करत असल्याने ...

खुलताबादेत दररोज दोन टन कचऱ्याचे वर्गीकरण
सुनील घोडके
खुलताबाद : शहरात दररोज दोन टन कचरा निघतो. नगर परिषद घनकचरा प्रकल्पात यापासून खत निर्मिती करत असल्याने शहरात स्वच्छता दिसून येत असल्याची स्थिती आहे. शहरातील स्वच्छतेबाबत उत्कृष्ट काम होत असल्याने यासाठी नगर परिषदेस त्याअनुषंगाने पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. खुलताबाद नगर परिषदेत स्वच्छता विभागाकडून पहाटे सहापासून शहरातील विविध भागात स्वच्छतेच्या अनुषंगाने घंटागाडीच्या माध्यमातून कचरा जमा करण्यात येतो.
सफाई कामगार सकाळी ठरवून दिलेल्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येते. मात्र काही ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सुद्धा आहे. स्वच्छता कामगार व्यवस्थित काम करतात का नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासह प्रत्येक ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर त्याचे फोटो घेतले जात असल्याने कामगार जबाबदारीने काम करत असल्याची स्थिती आहे.
------- सराईत घनकचरा प्रकल्प -------
खुलताबाद नगर परिषदेकडे शहरातील कचरा जमा करण्यासाठी चार घंटागाडी, दोन ट्रँक्टरच्या माध्यमातून काम करते. कामावर वॉच राहावे या उद्देशाने वाहनास जीपीएस यत्रंणा बसविण्यात आली आहे. शहरात दररोज दोन टन कचरा उचलला जात असून तो सराई येथील घनकचरा प्रकल्पात आणल्यानंतर ओल्या कच-यापासून खत निर्मिती केली जाते. तसेच सुक्या कच-यातून प्लास्टिक कापड, कँरी बँग वेगळे करून ते एका पिशवीत भरून कंपनीस पाठविल्या जाते.
-------- खुलताबाद विभागात अव्वल ------
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१७-१८ मध्ये शहर हगणदारी मुक्त झाले होते. या कामगिरीबद्दल खुलताबाद नगरपरिषदेस शासनाकडून एक कोटीचे बक्षीस मिळाले आहे. यासह २०१८-१९ मध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणात केलेल्या कामामुळे सर्व्हेक्षण स्पर्धेत खुलताबाद राज्यात १९ व्या क्रमांकावर तर औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकांवर होते.
------- कोट ------
नगर परिषद शहरातील स्वच्छतेबाबत चांगले काम करीत आहे. यात लोकप्रतिनिधी, सफाई कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यासह शहरातील नागरिक सुद्धा प्रशासनास सहकार्य करत आहे. यापुढेही स्वच्छता मोहीम अधिक गतीमान करून खुलताबाद शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहेे.
- अंकुश भराड पाटील,
स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद खुलताबाद.
----कॅप्शन : खुलताबाद शहरात घंटागाडीद्वारे कचरा संकलन करतांना कर्मचारी.