दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: April 20, 2016 23:23 IST2016-04-20T23:09:35+5:302016-04-20T23:23:32+5:30
परतूर : सिगारेट व तंबाखूचे पैसे देण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन दुचाकीही जाळण्यात आल्या.

दोन गटात हाणामारी
परतूर : सिगारेट व तंबाखूचे पैसे देण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन दुचाकीही जाळण्यात आल्या. परस्पर विरोधी तक्रारीवरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर शहरातील पारधीवाडा येथे शिवा चव्हाण व संज्या चव्हाण यांनी किराणा दुकान चालक जुबेर कुरेशी हे १९ एप्रिल रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आपल्या दुकानात बसले असता ते तेथे आले व घेतलेल्या सिगारेट व तंबाखूचे पैसे देण्यास नकार दिला यावरून शिवीगाळ करून दुकानातील सामानाची नासधूस केली. तसेच गल्ल्यातील ६ हजार ५०० रूपयांची रोकड काढून घेतली. तसेच दुकाना समोरल दोन मोटारसायकल पेट्रोल टाकून जाळून टाकल्या. याबराबरच विजू कुरेशी, जुबेर कुरेशी रफीक रहीमोद्दीन कुरेशी, लुकमान कुरेशी यांनी शिवा पवार याला शिवीगाळ करून मारहाण केली. परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या.