शहराचे नवीन तहसील सुरू; कामकाज ठप्प
By Admin | Updated: April 20, 2016 00:20 IST2016-04-20T00:12:40+5:302016-04-20T00:20:24+5:30
औरंगाबाद : शहरासाठी नवीन अप्पर तहसील कार्यालय ८ फेबु्रवारी रोजी औपचारिकरीत्या सुरू करण्यात आले असेल, तरी अजून त्या कार्यालयातून गतिमान कामकाजाला सुरुवात झालेली नाही.

शहराचे नवीन तहसील सुरू; कामकाज ठप्प
औरंगाबाद : शहरासाठी नवीन अप्पर तहसील कार्यालय ८ फेबु्रवारी रोजी औपचारिकरीत्या सुरू करण्यात आले असेल, तरी अजून त्या कार्यालयातून गतिमान कामकाजाला सुरुवात झालेली नाही. एन-ए व इतर चालान भरण्याची कामे सुरळीत होत नसल्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्याकडे तक्रार केली आहे.
चालान भरण्यासाठी असलेल्या ग्राफप्रणालीचा कोड लेखाकोष विभागाकडून अप्पर तहसीलदार विजय राऊत यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत. ग्रामीण तहसीलमध्येही कामे सुरळीत आहेत. त्यांच्याकडूनही चालान भरले तरी हरकत नाही; परंतु कुठलाही तांत्रिक घोळ होऊ नये यासाठी अप्पर तहसीलमधूनच व्यवहार करण्याची नागरिकांची इच्छा आहे.
तहसील कार्यालय सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. अजून ग्राफप्रणालीचा युजर आयडी अप्पर तहसीलदार राऊत यांना मिळालेला नाही. तहसीलदारांच्या नावे स्वतंत्र खाते असते. त्यामध्ये चालान व ठेक्यांची रक्कम भरण्याची सोय आहे. सर्व व्यवहार आॅनलाईन केला जातो. प्रत्येक तहसीलला स्वतंत्र खाते आहे. २२ जानेवारी २०१६ रोजी महसूलमंत्र्यांनी वर्ग-१ च्या जमिनीबाबत तहसीलदारांना आदेश दिले आहेत.