शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

शहराला फक्त नालेच बुडविणार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:56 AM

हरात अतिवृष्टी अथवा मुसळधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण घरे पाण्याखाली येणार हे निश्चित. कारण शहरातील सर्व मोठे नाले गाळ, केरकचरा आणि अतिक्रमणांनी व्यापले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात अतिवृष्टी अथवा मुसळधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण घरे पाण्याखाली येणार हे निश्चित. कारण शहरातील सर्व मोठे नाले गाळ, केरकचरा आणि अतिक्रमणांनी व्यापले आहेत. हे चित्र आपली महापालिका उघड्या डोळ्याने बघत असली तरी ठोस उपाययोजना करायला तयार नाही. उलट १ कोटी ७० लाख रुपये खर्च करून नालेसफाईचे निव्वळ नाट्य रंगविण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी शहरात झालेल्या थोड्याशा पावसानेच महापालिकेचे पितळ उघडे पडले. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे.रविवारी सकाळी महापालिका पदाधिकारी व आयुक्तांतर्फे शहरातील नाल्याच्या पाहणीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्तांनी ऐनवेळी या मोहिमेतून अंग काढून घेतले. महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन यांच्यासह अधिकाºयांचा फौजफाटा महापौर बंगल्यावरून नालेसफाईची पाहणी करण्यास निघाला. पदाधिकारी येणार असल्याने अगोदरच महापालिकेची यंत्रणा ठिकठिकाणी अलर्ट होती. नालेसफाईची पाहणी करण्यासाठी दरवर्षीचे काही स्पॉट ठरलेले आहेत. याला राजकीय भाषेत पिकनिक स्पॉटही म्हणतात.रविवारी सकाळी पदाधिकारी व अधिकाºयांचा ताफा पदमपुरा भागातील दिवेकर आॅटोसमोरील नाल्याजवळ पोहोचला. येथील अरुंद नाला मागील १२ ते १३ वर्षांपासून उघडलाच नव्हता. या नाल्यावरील एका ढाप्याचे वजन १ टनापेक्षा जास्त आहे. क्रेन लावून ढापे काढण्यात आले. नाला गाळाने पूर्णपणे चोकअप झाला होता. कंत्राटदाराने अत्यंत मन लावून नाल्याची सफाई केल्याचे दिसून येत होते.येथून पाहणी दौरा थेट महापालिका मुख्यालजवळील नूर कॉलनीत पोहोचला. तेथील परिस्थिती अत्यंत विदारक होती. मनपाने नाल्यातच पाईप टाकले आहेत. त्यामुळे आसपासच्या घरांमध्ये दरवर्षीच पाणी साचते. पाईप काढून नाल्याशेजारी राहणाºयांना अलर्टची नोटीस देण्याचे आदेश महापौरांनी दिले. नारळीबाग भागात माणसे लावून नाला साफ करण्याचे आदेश दिले. येथे एका पोकलेनच्या साह्याने नाल्यातील गाळ काढून काठावरच टाकण्यात येत होता. मोठा पाऊस आल्यास गाळ आपोआप वाहून जातो. १ कोटी ७० लाख रुपयांचेकाम घेणारा कंत्राटदार परत नालेसफाईचा दावा करायला ‘मोकळा’ होतो.किलेअर्क येथील नाल्याची अवस्था पाहून पदाधिकारीही क्षणभर अवाक् झाले. नाल्यात थर्माकोल, कचरा, गाळ साचल्यामुळे व अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी जाण्यास जागाच नाही. नाल्याच्या आसपास राहणा-या नागरिकांना यंदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. टिळकपथ भागातील औषधी भवन येथील नाल्याची अवस्था बघताना तर धडकीच भरत होती.नाल्यात थर्माकोल, केचरकचरा एवढा होता की, पाणी पुढे कसे जाईल हा सर्वात मोठा प्रश्न होता. येथे जेसीबी, पोकलेनही जाऊ शकत नाही. औरंगाबाद केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने मनपाला नाला साफ करण्यासाठी पाच लाख रुपये दिले. या निधीत काय होणार, असा प्रश्न मनपाला पडला आहे. न्यू उस्मानपुरा, गारखेडा, जयभवानीनगर चौक या भागातील नाल्यांचीही पाहणी करण्यात आली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका