शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

शहर पाणीपुरवठा योजना १,६८० वरून २,७०० कोटींवर; केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:25 IST

१ हजार २० कोटींच्या वाढीसह योजना २,७०० कोटींवर गेली आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने २०१९ साली शहरासाठी मंजूर केलेल्या १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्यास मंजुरी मिळाली असून, १ हजार २० कोटींच्या वाढीसह योजना २,७०० कोटींवर गेली आहे.

नवीन योजनेत समावेश करताना मूळ किंमत १,६८० रुपये त्यात कंत्राटदारांनी स्टीलच्या भाववाढीमुळे मागणी केलेले ४२५ कोटी आणि ओ ॲण्ड एमआरचे (मटेरिअल रिव्ह्यू) ६०० कोटी याप्रमाणे सुमारे २,७०० कोटी रुपयांवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही. जून महिन्यात १५ तारखेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १,६८० कोटींच्या योजनेचा आढावा घेतला, योजनेच्या कामाला ३ वर्षे लागणार असल्यामुळे जुनी ७०० मि.मी.ची जलवाहिनी पुनरुज्जीवित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मांडला, त्याचे अंदाजपत्रक २०० कोटींवर गेले. ठाकरे यांना ते कळविले; परंतु त्यांचे सरकार गेल्याने प्रशासकीय पातळीवरच या जुन्या व नवीन योजनेचा कारभार सुरू आहे.

शासनाने कशाला दिली मंजुरी?राज्य शासनाने केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये शहर पाणीपुरवठा योजनेचे दोन्ही टप्पे समावेश करण्यास मंजुरी दिली. १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होऊन वर्ष लोटले. पहिल्या टप्प्यात १,३४० कोटी रुपयांच्या निविदेचे काम जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनी करीत आहे. त्यात जलकुंभांची उभारणी, दोन एमबीआर, तीन जलशुद्धीकरण केंद्रे, १,९०० किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे शहरात टाकणे, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ४० कि.मी. अंतरात २,५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, जलकुंभांना जोडणारी जलवाहिनी टाकण्यासह इतर कामे करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात या कामांचा समावेशदुसऱ्या टप्प्यात पम्पिंग स्टेशन उभारणे, नवीन पंप बसविणे व इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. सध्या काम सुरू असले तरी केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये योजनेचा समावेश करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. केंद्राच्या नियमानुसार योजनेमध्ये बदल करून २,७०० कोटी रुपयांचा डीपीआर मध्यंतरी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शासनाकडे सादर केला. यात मूळ किंमत १,६८० कोटी रुपये, कंत्राटदारांकडून वाढीव रक्कम ४२५ कोटी रुपये, अशी २,१०५ कोटी रुपये त्यात ओ अँड एमआरचे ६०० कोटी, अशी एकूण २,७०० कोटी रुपयांवर नवीन पाणीपुरवठा योजना गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनपाला भरावे लागणार ५४० कोेटीकेंद्र शासनाच्या अमृत-२ मधून नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असली तरी यामध्ये केंद्र, राज्य शासन व मनपाचा हिस्सा असेल. मनपाला साधारणपणे २० टक्के म्हणजे सुमारे ५४० कोटी टाकावे लागतील.

सातारा-देवळाई ड्रेनेजच्या डीपीआरचा समावेशसातारा-देवळाईसाठी २५४ कोटी रुपयांचा ड्रेनेजच्या डीपीआरचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठीदेखील निधी वाटपाचे सूत्र केंद्र, राज्य आणि मनपा असेच राहणार आहे. मनपाला हिस्सा भरावाच लागणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी