शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या घोषणांनी शहर दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:31 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी बदली हवी आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी बदली हवी आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मोर्चेकरी शिक्षकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते.शनिवारी दुपारी २.३० वाजता जिल्हा परिषद मैदानावरून हा मोर्चा निघाला. औरंगपुरा, गुलमंडी, सिटीचौक, काळा दरवाजामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी शिक्षक व शिक्षिकांच्या हातात विविध घोषणांचे फलक होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा गेल्यानंतर उपस्थित महिलांनी आपल्या व्यथा मनोगताद्वारे व्यक्त केल्या. त्यानंतर ५ महिलांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात मंगला मदने, कौसर शेख, अर्चना गोर्डे, सारिका निवारे व जयश्री लाड या शिक्षिकांचा सामावेश होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले व ग्रामविकास सचिवांकडे मोर्चेकºयांच्या भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या मोर्चास अनेक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. मोर्चात हजारो शिक्षक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.