शहरामध्ये एकाच दिवसात तापमानात ९ अंशांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:52 IST2019-01-31T23:47:59+5:302019-01-31T23:52:41+5:30

औरंगाबाद : शहरात आगामी आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना अवघ्या एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल ९ अंशांनी वाढ झाली आहे. शहरात बुधवारी किमान तापमान ७ अंश होते, तर चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी किमान तापमान १६ अंश नोंदविल्या गेले.

 The city recorded a 9-degree increase in temperature in one day | शहरामध्ये एकाच दिवसात तापमानात ९ अंशांनी वाढ

शहरामध्ये एकाच दिवसात तापमानात ९ अंशांनी वाढ

औरंगाबाद : शहरात आगामी आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना अवघ्या एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल ९ अंशांनी वाढ झाली आहे. शहरात बुधवारी किमान तापमान ७ अंश होते, तर चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी किमान तापमान १६ अंश नोंदविल्या गेले.
शहराच्या तापमानात २७ जानेवारीपासून अचानक घसरण सुरूझाली. चार दिवस सलग तापमानात घट होत गेली. यामध्ये जानेवारी महिन्यात गतवर्षीपेक्षा बुधवारी (दि.३०) सर्वात कमी तापमान नोंदविले गेले. हिमालयातील बर्फवृष्टीमुळे अतिथंड वाऱ्यामुळे तापमान घसरल्याचे चिकलठाणा वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. आणखी काही दिवस थंडीचा जोर राहील, असे वाटत असताना गुरुवारी तापमानात चांगलीच वाढ झाली. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान २७.८ तर १६.० अंश इतके नोंदविण्यात आले.

Web Title:  The city recorded a 9-degree increase in temperature in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.