शहर पोलीसची सुप्रीम सी. सी. संघावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:52 IST2018-02-12T00:52:25+5:302018-02-12T00:52:30+5:30

आमखास मैदानावर सुरू असलेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीसने सुप्रीम सी. सी. संघावर मात केली. शहर पोलीसने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६९ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून सुदर्शन एखंडेने ३५ चेंडूंत ५३ आणि विकास नगरकरने २६ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस पाडला. प्रत्युत्तरात सुप्रीम सी. सी. संघ १९ षटकांत १२८ धावांत सर्वबाद झाला.

 City police supreme c. C. Beat the team | शहर पोलीसची सुप्रीम सी. सी. संघावर मात

शहर पोलीसची सुप्रीम सी. सी. संघावर मात

औरंगाबाद : आमखास मैदानावर सुरू असलेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीसने सुप्रीम सी. सी. संघावर मात केली.
शहर पोलीसने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६९ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून सुदर्शन एखंडेने ३५ चेंडूंत ५३ आणि विकास नगरकरने २६ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस पाडला. प्रत्युत्तरात सुप्रीम सी. सी. संघ १९ षटकांत १२८ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून झुबेर कुरैशीने २९ चेंडूंत ५३ व जहीरने १८ धावा केल्या. शहर पोलीसकडून आनंद गायके याने ४ षटकांत फक्त ७ धावा देऊन ३ गडी बाद केले.
दुसºय सामन्यात जफर बिल्डर संघाने १६ षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. त्यांच्याकडून इकबालने २६ चेंडूंत ४० व अबुबकर याने ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफान थ्री स्टोन संघ ७६ धावांत गारद झाला.

Web Title:  City police supreme c. C. Beat the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.