शहराला लाभले २३ नवीन चार्टर्ड अकाऊंटंट; सीए अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 13:17 IST2021-02-02T13:16:50+5:302021-02-02T13:17:53+5:30

CA final exam : या अंतिम परीक्षेत औरंगाबाद शहरातून अनिरुद्ध ठोंबरे व पराग सोमाणी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला

City gets 23 new chartered accountants; CA final exam results announced | शहराला लाभले २३ नवीन चार्टर्ड अकाऊंटंट; सीए अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर

शहराला लाभले २३ नवीन चार्टर्ड अकाऊंटंट; सीए अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर

औरंगाबाद : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस‌् ऑफ इंडिया (आयसीएआय) द्वारा डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंट (सीए) च्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात शहरातील २३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सीए झाले आहेत, अशी माहिती स्थानिक सीए संघटनेतर्फे देण्यात आली.

या अंतिम परीक्षेत औरंगाबाद शहरातून अनिरुद्ध ठोंबरे व पराग सोमाणी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय क्रमांक आयुष बोहारा, तिसरा क्रमांक पूर्वा साहुजी हिने, तर कुणाल मिनियार याने चौथा क्रमांक प्राप्त केला. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये अनुराधा साहुजी, मकरंद शिंपी, प्रीती पाटोडी, प्रतीक देशपांडे, केशव आर्दड, अदिती धुत, प्रतीक्षा कासलीवाल, प्रगती शिंकर, रोशन पांडे, निकिता भवनाणी, ओमकार खोचे, ज्योती राणा, डॉली बोरा, प्रांजल चेचानी, हिना तनेजा, प्रतीक्षा राठीं, माधुरी पूल व विकास काळे याचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सीए संघटनेचे अध्यक्ष गणेश शिलवंत व योगेश अग्रवाल यांनी कौतुक केले.
 

Web Title: City gets 23 new chartered accountants; CA final exam results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.