उद्यापासून सुरु होणारा शहर बस; मात्र तिकीट दरात झाली ७ % वाढ, जाणून घ्या नवे भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:06 IST2020-11-04T18:03:55+5:302020-11-04T18:06:31+5:30

इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर पूरक खर्चांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन दर सुधारित करण्यात आले आहेत.

City bus starting tomorrow; However, the ticket price increased by 7%, find out the new fare | उद्यापासून सुरु होणारा शहर बस; मात्र तिकीट दरात झाली ७ % वाढ, जाणून घ्या नवे भाडे

उद्यापासून सुरु होणारा शहर बस; मात्र तिकीट दरात झाली ७ % वाढ, जाणून घ्या नवे भाडे

ठळक मुद्देबससेवेचे सुधारित दर व्यवस्थापनाकडून जाहीर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १६.५१ रूपयांची वाढ झाली

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे बंद असलेली स्मार्ट सिटीची शहर बस सेवा गुरुवारपासून सुरू होत आहे.  डिझेल दरवाढीमुळे बसच्या दरामध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी दिली. ही दरवाढ ७.६१ टक्के इतकी आहे. 

इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर पूरक खर्चांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन दर सुधारित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत डिझेलच्या दरात प्रतिलिटर १६.५१ रूपयांची वाढ झाली आहे़  ही वाढ २८ टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी बससेवेच्या प्रत्येक किलोमीटरच्या किमतीमध्ये जानेवारी २०१९ च्या तुलनेने ३.४२ रूपये वाढ झाली आहे़  इंधन दरवाढीमुळे एकूणच कामकाजाच्या किमतीत ७.६१ टक्के वाढ झाली आहे. ही दर सुधारणा किंचित स्वरूपाची असून, देण्यात येणाऱ्या सुविधांचा विचार करता औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवा ही महाराष्ट्रात सर्वात परवडणारी सार्वजनिक बस सेवा असल्याचे भुसारी यांनी सांगितले.

शहरातील या मार्गांसाठी असे असणार भाडे :
- रेल्वेस्टेशन ते शहागंज १५ रूपये, 
- रेल्वेस्टेशन ते हर्सुल सावंगी २५ रूपये, 
- रेल्वे स्टेशन ते हर्सुल टि पॉइंट २५ रूपये,
- रेल्वेस्टेशन ते सिडकोमार्गे एम-२ फेरीसाठी २५ रूपये, 
- औरंगपुरा ते रांजणगावमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये, 
- औरंगपुरा ते बजाजनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये, 
- औरंगपुरा ते हिंदुस्तान आवासमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये, 
- औरंगपुरा ते वाळूजमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये,
- औरंगपुरा ते शिवाजीनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २० रूपये, 
- सिडको ते जोगेश्वरीमार्गे बाबा पेट्रोलपंप ३५ रूपये, 
- सिडको ते विद्यापीठमार्गे क्रांतीचौक २५ रूपये, 
- सिडको ते रेल्वेस्टेशनमार्गे बीडबायपास २५ रूपये, 
- चिकलठाणा ते रांजणगावमार्गे बाबा पेट्रोलपंप ३० रूपये, 
- औरंगपुरा ते बजाजनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये, 
- रेल्वेस्टेशन ते रेल्वेस्टेशनमार्गे सिडको हर्सुल टि पॉईंट ३० रूपये, 
- सिडको ते रांजणगाव मार्गे एम-२ फेरीसाठी ३५ रूपये, 
- रेल्वेस्टेशन ते चिकलठाणामार्गे एसएससी बोर्ड २५ रूपये, 
- रेल्वेस्टेशन ते भावसिंगपुरामार्गे क्रांतीचौक २० रूपये, 
- रिंग रोड रेल्वे स्टेशनमार्गे सेव्हनहिल ३० रूपये, 
- रेल्वेस्टेशन ते औरंगाबाद  लेणीमार्गे टाऊन हॉल २० रूपये, 
- मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंपमार्गे एन-३ साठी २० रूपये, 
- सेंट्रल बसस्टँड ते बिडकीन ३५ रूपये, सेंट्रल बसस्टँड ते फुलंब्री ४० रूपये,
- सेंट्रल बसस्टँड ते वेरूळ ४५ रूपये, 
- सेंट्रल बसस्टँड ते करमाड ३५ रूपये

Web Title: City bus starting tomorrow; However, the ticket price increased by 7%, find out the new fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.