शहर बस प्रवाशांना आजपासून मिळणार स्मार्ट कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:47+5:302020-12-17T04:29:47+5:30
मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाई औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी शहरात ठिकठिकाणी कारवाई केली. नंदनवन कॉलनी भागातील ...

शहर बस प्रवाशांना आजपासून मिळणार स्मार्ट कार्ड
मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाई
औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी शहरात ठिकठिकाणी कारवाई केली. नंदनवन कॉलनी भागातील संगीता कॉलनी येथे उद्यानात बस्ते या व्यक्तीने ३ बाय ३० फूट लांब अतिक्रमण केले होते. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या उपस्थितीत सोमवारी अतिक्रमण काढण्याचे काम करण्यात आले. राजाबाजार, नवापुरा येथे महापालिकेची बांधकाम परवानगी घेतल्यानंतर अतिरिक्त बांधकाम करण्यात येत असल्यामुळे ते काम थांबविण्यात आले. शांतीपुरा येथील अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी असलेले साहित्य जप्त करण्यात आले. जयसिंगपुरा येथे जावेद हनफी यांचेही बांधकाम बंद करण्यात आले.
जाधववाडी येथे ६९ नागरिकांची तपासणी
औरंगाबाद : जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी महापालिकेच्या पथकाने ६९ नागरिकांची कोरोना तपासणी केली. रविवारी ज्या नागरिकांची तपासणी केली होती, त्यातील एकही नागरिक पॉझिटिव्ह आला नाही.
रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे ६१३ प्रवाशांची तपासणी
औरंगाबाद : दिल्लीहून सचखंड एक्सप्रेसद्वारे शहरात दाखल होणाऱ्या ५०० प्रवाशांची तपासणी रविवारी आणि सोमवारी करण्यात आली. रविवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती, त्यातील दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले. विमानतळावर मागील दोन दिवसांमध्ये ११३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
करवसुलीसाठी ४ मोबाइल टॉवर सील
औरंगाबाद : महापालिकेच्या झोन क्रमांक १ तर्फे पडेगाव भागात मालमत्ता कर थकबाकीपोटी ४ टॉवर्स सील करण्यात आले. चार वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांनी ७० लाखांपेक्षा अधिक कर महापालिकेचा थकविला होता. ही कारवाई झोन अधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्या पथकाने केली.