नम्रतानगर हा भाग ईसारवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत असून, ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून या भागाकडे प्रत्येक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सतत दुर्लक्ष केले. हा परिसर विकासापासून वंचित असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. कित्येक दिवसांपासून सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने महिलांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्यांनी त्रस्त होऊन नम्रतानगर येथील सर्व मतदार जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर स्वप्निल चाळक, रफीक शेख, योगेश गव्हाणे, राहुल खोलासे, अल्ताफ शेख, सचिन वीर, कृष्णा साबळे, कालू पटेल, श्रीकांत शेकडे, ऋषिकेश गायकवाड, सोहेल शेख, बालू दातिर, अंकुश भवर, संतोष साळवे, शब्बीर पठाण, विलास तांबे आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो : तहसीलदार शेळके यांना निवेदन देताना नम्रतानगरचे नागरिक.