सिडकोत अघोषित कचरा डेपो

By Admin | Updated: August 14, 2014 01:52 IST2014-08-14T01:35:16+5:302014-08-14T01:52:18+5:30

औरंगाबादेत सिडकोतही हाच प्रश्न भेडसावत असताना आता वाळूजच्या सिडकोत ही समस्या गंभीर बनली आहे.

Cidkot Undeclared Garbage Depot | सिडकोत अघोषित कचरा डेपो

सिडकोत अघोषित कचरा डेपो

वाळूज महानगर : आयडियल शहर निर्माण करणारी संस्था म्हणून सिडको प्रशासनाचा राज्यभर गवगवा करण्यात येतो. नवीन शहरे वसविताना सर्व मूलभूत सोयी-सुविधा प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र, नागरिकांनी कचरा कुठे टाकावा याचे नियोजन अजिबात करण्यात येत नाही. औरंगाबादेत सिडकोतही हाच प्रश्न भेडसावत असताना आता वाळूजच्या सिडकोत ही समस्या गंभीर बनली आहे.
सिडको वाळूज महानगरात अघोषित कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या भागात साफसफाईचे काम ठेकेदारामार्फत करण्यात येते. परिसरात जमा झालेला कचरा संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी सिडकोच्या जलकुंभालगत आणून टाकतात. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे डोंगर तयार होत आहेत. जवळच नागरी वसाहती असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग
सध्या या परिसरात मोकळ्या भूखंडावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, वाऱ्याबरोबर हा कचरा कॉलनीत नागरिकांच्या घरात जात असल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिडको प्रशासनाच्या वतीने कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. कचऱ्यामुळे मोकाट जनावरे व कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, ये-जा करणाऱ्या महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात दोन शाळा असून, सिडकोचा जलुकंभही आहे.
सतत पाठपुरावा
अघोषित कचरा डेपो हटविण्यासाठी त्रस्त नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. मात्र, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे. कचरा डेपोे इतरत्र हटवून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी प्रा. बी. जी. गायकवाड, राजन सोमासे, विकास रामटेके, माधव कांबळे, सी. के. जाधव, सविता निकम आदींनी केली आहे.

Web Title: Cidkot Undeclared Garbage Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.