नाताळ उत्साहात साजरा

By Admin | Updated: December 25, 2016 23:56 IST2016-12-25T23:55:27+5:302016-12-25T23:56:06+5:30

जालना: शहरासह जिल्ह्यात नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

Christmas celebrates in excitement | नाताळ उत्साहात साजरा

नाताळ उत्साहात साजरा

जालना: शहरासह जिल्ह्यात नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध चर्चमध्ये शनिवारी मध्यरात्री तसेच रविवारी विविध प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अनेक चर्चमध्ये गरजूंना वस्त्रदान करण्यात आले.
शहरातील मिशन हॉस्पिटलजवळील क्राईस्टचर्च मध्ये सकाळीच प्रार्थना सभा पार पडली. चर्चचे प्रमुख तसेच इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती.
प्रार्थना झाल्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच सेंटमेरी चर्च, बेथलम येथील सियोन चर्च, नूतन वसाहत भागातील टॉम डॉप्सन, न्यू लाईफ चर्च, सेव्हंथ डे अ‍ॅडव्हेंटिस्ट चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. सकाळी धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले. विविध चर्च तसेच अनेकांच्या घरोघर प्रभू येशू यांच्या जन्माचा देखावा करण्यात आला होता. हे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
बदनापूर शहरातही नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नाताळनिमित्त सकाळपासूनच बांधवांची गर्दी झाली होती. सकाळी प्रार्थना पार पडल्यावर विविध कार्यक्रम पार पडले.

Web Title: Christmas celebrates in excitement