वाळूजला हौदात पडलेल्या चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:04 IST2021-05-31T04:04:06+5:302021-05-31T04:04:06+5:30

याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज येथील बदाडे कुटुंबाच्या घरी रविवारी एका नातेवाइकाचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. घरातील मंडळी ...

Chimukali dies after falling into the sand | वाळूजला हौदात पडलेल्या चिमुकलीचा मृत्यू

वाळूजला हौदात पडलेल्या चिमुकलीचा मृत्यू

याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज येथील बदाडे कुटुंबाच्या घरी रविवारी एका नातेवाइकाचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. घरातील मंडळी कार्यक्रमात असताना गौरी घराबाहेर खेळत होती. खेळता-खेळता सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गौरी अंडरग्राउंड असलेल्या पाण्याच्या हौदात पडली. दरम्यान, गौरी दिसत नसल्याने नातेवाइकांनी तिचा कॉलनीत शोध केला. मात्र, ती कुठेही मिळून न आल्याने घरातील मंडळीनी हौदात डोकावून पाहिले असता, त्यांना गौरी पाण्यात पडलेली दिसली. हौदातून बाहेर काढून तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गौरी हिस मृत घोषित केले. या प्रकरणी घाटीतून वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फोटो -गौरी बदाडे (मयत)

–---------------------

Web Title: Chimukali dies after falling into the sand