मुलांचा ओढा तंत्रज्ञानाशी संबंधित खेळाकडे
By Admin | Updated: May 14, 2014 01:05 IST2014-05-14T01:04:06+5:302014-05-14T01:05:51+5:30
वांजरवाडा : विज्ञान तंत्रज्ञानाचे माणसाचे जगणेच बदलून टाकले असून स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले असून लहान मुलांच्या खेळातही बदल झालेला आहे.

मुलांचा ओढा तंत्रज्ञानाशी संबंधित खेळाकडे
वांजरवाडा : विज्ञान तंत्रज्ञानाचे माणसाचे जगणेच बदलून टाकले असून स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले असून लहान मुलांच्या खेळातही बदल झालेला आहे. या आधुनिक युगात लहान मुले निसर्गापासून व मैदानी खेळापासून दुरावत चालला असून तंत्रज्ञानाशी संबंधित खेळाकडे अधिक कल आहे. पूवी सुट्या म्हणले की आठवते ते मामाचा गाव, झाडी, मनसोक्त खेळ, गोट्या, विटी-दांडू, शिवाशिव, लपंडाव, झाडावरील डफ, भोवरा, तळ्यात-मळ्यात, चोर-पोलीस, चिरघोडी, कबड्डी, कुस्ती, मुकी कबड्डी, सुरपाट्या यासारख्या बुद्धीला व शरीराला व्यायाम देणारे खेळ खेळत होते. आधुनिक युगात शरीराला व्यायाम देणार्या खेळाकडे दुर्लक्ष झाले असून लहान मुलांचा ओढा मात्र तंत्रज्ञानाशी संबंधित खेळाकडे कल वाढलेला आहे. यामध्ये मोबाईल गेम्स, संगणकावरील गेम्स, व्हॉटस् अप, कार्टून या गोष्टीकडे अधिक भर दिला जात आहे. पुस्तके वाचनाचा छंद कमी झाला असून टीव्ही कडे अधिक कल असून गावाभोवताली पूर्वीची असणारी दाट हिरवीगार झाडे, पक्षांचा किलकिलाट बंद होताना दिसत आहे. खेळामध्ये मुलांचा सर्वात जास्त कल क्रिकेट या खेळाकडे दिसून येत असून गल्लोगल्ली सध्याच्या सुट्ट्यामध्ये प्लॅस्टीक बॅट ते लाकडी बॅट व स्टम्प आणि बॉलचा वापर सर्रास दिसून येत आहे. आधुनिक युगात कुस्ती, कबड्डी, पोहणे, चिरघोडी यासारखे खेळ कालबाह्य होत असून मुले डोळ्यांना चष्मा लावून सतत मोबाईल गेम्स व संगणकावरील गेम्स खेळण्यात मग्न दिसत आहेत. नेट-कॅफेवरील गर्दी हाऊसफुल होताना दिसून येत आहे. गावोगावीचे खेळाचे मैदान नामशेष झाले असून त्यांची जागा इमारतीने घेतली आहे. त्यामुळे खेळ आता गल्लीतल्या रस्त्यावर आला आहे. वाचनालयाच्या गर्दीपेक्षा नेट कॅफेमधील गर्दी वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच गावालगत व सावलीखाली, शाळेच्या प्रांगणात क्रिकेटचे भन्नाट सामने रंगताना दिसून येत आहे. यामुळे पारंपारिक खेळाचे विविध प्रकार पहावयास मिळत नाहीत. (वार्ताहर) यासंबंधी बोलताना डॉ. तानाजी चंदावार यांनी असे सांगितले की, ग्राऊंडवरचा विद्यार्थी हा टीव्ही समोरील विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सशक्त असतो. डोळ्यांचा आजार, मानेचा आजार व शारीरिक त्रास हे आजार वाढण्याचे कारण म्हणजे मोबाईल, टीव्ही, संगणक यांचा अतिवापर होऊ लागला आहे.