शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुलांवर लक्ष द्या ! ऑनलाइन गेमवर मुलाने आईच्या खात्यातील पैसे उडवले; रागावताच सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 1:01 PM

पुंडलिकनगर परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याचा १६ वर्षीय मुलगा इयत्ता दहावीत शिकतो. तो चार महिन्यांपासून आईच्या मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत होता.

ठळक मुद्दे पोलिसांनी शोध घेऊन मुलाला केले पालकांच्या स्वाधीनआईचे पेटीएमचे, ऑनलाइन बँकिंगचे पासवर्ड त्याला माहीत होते परस्पर खात्यातून १०० ते ३०० रुपये भरून तो गेम खेळत होता.

औरंगाबाद : मोबाइलमध्ये ऑनलाइन गेम खेळण्यासाठी परस्पर आईच्या बँक खात्यातून आठ हजार खर्च केले. हे कळल्यावर आई रागावली. त्यामुळे घर सोडून गेलेल्या १६ वर्षीय मुलाला पुंडलिकनगर पोलिसांनी शोधून आणत पालकांच्या स्वाधीन केले. मोबाइलमुळे मुले काय करताहेत याकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके यांनी सांगितले की, पुंडलिकनगर परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याचा १६ वर्षीय मुलगा इयत्ता दहावीत शिकतो. तो चार महिन्यांपासून आईच्या मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत होता. आईचे पेटीएमचे, ऑनलाइन बँकिंगचे पासवर्ड त्याला माहीत असल्याने परस्पर खात्यातून १०० ते ३०० रुपये भरून तो गेम खेळत होता. आईने काही दिवसांपूर्वी पासबुक अपडेट केले. त्यावेळी खर्च केलेल्या पैशाचा जाब मुलाला विचारला. तेव्हा मुलाने ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे खर्च केल्याचे सांगितले. आई त्याच्यावर रागावल्याने १५ जून रोजी रात्री तो घर सोडून निघून गेला. १६ जूनला आई-वडिलांनी पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलीस पथकाने दोन दिवस शोध घेतला. दरम्यान, १७ जूनला दुपारी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाइलवरून मुलाने आईला फोन करून हॅलो म्हणून फोन कट केला. त्या फोनबद्दल आईने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या मोबाइलच्या ठिकाणाचा शोध लावत साजापूर फाटा गाठले. पोलिसांसोबत आई-वडिलांना पाहून मुलगा लपून बसला. पुन्हा काही वेळाने मुलगा भेटला. विश्वासात घेतल्यानंतर त्याने आई रागावल्याने घर सोडल्याचे सांगत पैसे मोबाइल गेमवर खर्च केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन करत मुलाकडे लक्ष देण्याचे सांगितले.

मुलांवर लक्ष द्यापालकांनी आपली मुले मोबाइलवर किती वेळ घालवतात. ते काय करतात. कोणता गेम व किती वेळ गेम खेळतात. यावर लक्ष ठेवून वेळीच काळजी घ्यावी, असे आवाहन पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी